टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील ऐतिहासिक जेतेपदानंतर हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा यांचे मैदानातील प्रेमाचे चाळे चर्चेचा विषय ठरत आहे. एकमेकांवरील प्रेम दाखवताना या जोडीनं अक्षरश: कहर केला. बेभान सेलिब्रेशन करताना क्रिकेटरनं राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचाही आरोप झाला. या मुद्यावरून चर्चा रंगत असताना आता पांड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माची पोस्ट चर्चेत आली आहे. ट्रोलर्संना प्रत्युतर देताना तिनेही पांड्यासारखा अॅटीटयूड दाखवल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काय आहे माहिका शर्माची पोस्ट
Hardik Pandya Girlfriend Mahika Sharma Reply To Trolls
भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलनंतर हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा यांचे सेलिब्रेशन अनेकांना खटकले आहे. यावरुन ट्रोल करणाऱ्या मंडळींना उद्देशून माहिकानं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून आपल्या ट्रोलर्संना प्रत्युत्तर देणारी बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड यांची मीम्स शेअर केली आहे. यात “जा तू माहिका सारखं नशीब घेऊन माझ्या आयुष्यात ये.” असं खास कॅप्शन तिने दिले आहे. Never Settle यासह तिने महिलांना आत्मसन्मान जपण्याचा संदेशही दिला आहे. ही महिला सन्मानापेक्षा अॅटीटयूड दाखवणारी अशीच आहे.
हार्दिक पांड्या अडचणीत! पुणे पोलिसांनी दाखल केला गुन्हा; टी२० विश्वचषक जिंकल्यानंतरचं प्रकरण काय?
राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा गंभीर आरोप
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलनंतर हार्दिक पांड्याने मैदानात गर्लफ्रेंडसोबत झिंगाट सेलिब्रेशन केले. आनंदाच्या भरात हार्दिक पांड्याने खांद्यावर तिरंगा असताना गर्लफ्रेंड माहिकासोबत जमीनीवर झोपून फोटो सेशन केल्याचे पाहायला मिळाले. त्याची ही कृती राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी होती, असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणात पुण्यातील शिवाजी नगर पोलिस स्थानकासह बंगळुरुमध्येही तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा मुद्दा गाजत असताना हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नशीबाचा खेळावर जोर देत बिनधात्स असल्याचे दिसते.
कोण आहे माहिका शर्मा?
माहिका शर्मा ही प्रसिद्ध मॉडेल असून तिने यावर्षी १९ फेब्रुवारीला २५ वा वाढदिवस साजरा केला. त्याआधी हार्दिक पांड्याने आपल्या बर्थडे तिच्यासोबत साजरा करत प्रेमाची नवी इनिंग सुरु केल्याची कबुली दिली होती. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान सातत्याने माहिका हार्दिक पांड्याच्या अवतीभोवती दिसली.