Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hardik Pandya, IND vs SA: "आता तू कर्णधार नाहीयेस हे लक्षात ठेव"; हार्दिक पांड्याला सूचक इशारा

हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने जिंकलं IPL विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 19:05 IST

Open in App

Hardik Pandya, Team India: मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) चार वेळा खेळाडू म्हणून IPL ट्रॉफी उंचावलेल्या हार्दिक पांड्याने रविवारी पहिल्यांदा संघाचा कर्णधार म्हणून ट्रॉफी जिंकली. गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिकने फायनल सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात उत्तम कामगिरी करून दाखवत संघाला पदार्पणाच्या हंगामातच विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिक अप्रतिम नेतृत्वशैलीची साऱ्यांनाच भुरळ पडली. हार्दिक पांड्या आणि आशिष नेहरा या जोडीचा क्रिकेट जाणकारांनी उदो-उदो केला. इंग्लंडच्या माजी कर्णधाराने तर हार्दिक पांड्या हा भविष्यातील कर्णधार आहे असे मोठे विधान केले. पण, सध्या हार्दिक पांड्या कर्णधार नाहीये हे त्याने लक्षात ठेवायला हवं, असं रोखठोक आणि सूचक विधान विराट कोहलीचे लहाणपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा म्हणाले.

"हार्दिक पांड्याने IPL मध्ये उत्तम फलंदाजी केली यात वादच नाही. ज्याने जबाबदारीने फलंदाजी केली आणि संघासाठी खूपच चांगली कामगिरी करून दाखवली. त्या संघात तो कर्णधार होता पण आता टीम इंडियामध्ये तो कर्णधार नाहीये हे त्याने लक्षात ठेवावं. भारतीय संघातील त्याचा रोल ठरलेला आहे. आता त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी मिळणार नाही. त्याला टीम इंडियात फिनिशर म्हणूनच स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्याने त्या प्रकारची तयारी करायला हवी", असे सूचक विधान शर्मा यांनी केले.

दरम्यान, IPLच्या २०२२ हंगामाची सुरूवात होण्याआधी हार्दिक पांड्या फिटनेसमुळे संघाबाहेर होता. तो गुजरातच्या संघात कसा खेळेल, गोलंदाजी करेल का, नेतृत्व कसे करेल, असे अनेक सवाल अनेकांच्या मनात होते. त्या साऱ्या प्रश्नांची हार्दिकने आपल्या कामगिरीच्या माध्यमातून उत्तरं दिली. हार्दिकच्या कर्णधारपदावरही अनेक क्रिकेट जाणकार खुश झाले. याचबाबत बोलताना, हार्दिक भारताचा भविष्यातील कर्णधार होऊ शकतो, असा विश्वास मायकल वॉनने व्यक्त केला. "नव्या कोऱ्या संघाने IPL जिंकणे ही उत्तम कामगिरी आहे. टीम इंडियाला पुढील २ वर्षांत नव्या कर्णधाराची गरज भासली, तर मी नक्कीच हार्दिक पांड्याव्यतिरिक्त इतर कोणाचा विचार करणार नाही", असे ट्वीट वॉनने केले.

टॅग्स :हार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघगुजरात टायटन्स
Open in App