हार्दिक पांड्यानं गोंदवलेला नवा टॅटू पाहिलात का? 

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा चर्चेत आला आहे. इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) हंगाम गाजवल्यानंतर पांड्यानं वर्ल्ड कप स्पर्धेतही चांगली कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 17:50 IST2019-07-25T17:49:12+5:302019-07-25T17:50:42+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Hardik Pandya gets inked; flaunts new 'lion' tattoo on Instagram | हार्दिक पांड्यानं गोंदवलेला नवा टॅटू पाहिलात का? 

हार्दिक पांड्यानं गोंदवलेला नवा टॅटू पाहिलात का? 

मुंबई : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा चर्चेत आला आहे. इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) हंगाम गाजवल्यानंतर पांड्यानं वर्ल्ड कप स्पर्धेतही चांगली कामगिरी केली. आगामी वेस्ट इंडिज मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात पांड्याला स्थान देण्यात आलेले नाही. दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आलेली आहे. पण, पांड्या आता चर्चेत आला आहे तो सोशल मीडियावर त्यानं केलेल्या एका पोस्टमुळे, पांड्यानं त्याच्या हातावर एक नवा टॅटू गोंदवून घेतला आहे आणि तो फोटो त्यानं शेअर केला आहे. हार्दिकनं त्याच्या हातावर सिंहाचा फोटो गोंदवला आहे.  


वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यानं 15व्या षटकानंतर उपचारासाठी पेव्हेलियनमध्ये धाव घेतली होती. त्यानंतर 21व्या षटकात तो मैदानावर परतला.  वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं 226 धावा केल्या, तर 10 विकेट्ही घेतल्या. आयपीएलच्या 2019च्याम मोसमात त्यानं 44.66 च्या सरासरीनं आणि 191.42 च्या स्ट्राईक रेटनं 402 धावा केल्या, शिवाय 14 विकेट्सही घेतल्या. 

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेला 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

Web Title: Hardik Pandya gets inked; flaunts new 'lion' tattoo on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.