Hardik Pandya dating Mahieka Sharma : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नताशा स्टॅन्कोविचपासून विभक्त झाल्यानंतर, क्रिकेटपटूचे नाव ब्रिटिश गायिका जस्मिन वालियाशी जोडले गेले होते. पण आता, हार्दिक पांड्याचे नाव एका वेगळ्याच मॉडेल-अभिनेत्रीशी जोडले जात आहे. या मॉडेल-अभिनेत्रीचे नाव आहे माहिका शर्मा. तो महिकाला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
नेमकी कशावरून रंगली चर्चा?
रेडिटवरील एका थ्रेडमध्ये महिकाच्या एका सेल्फीमध्ये मागे एक व्यक्ती दिसतोय, त्यावरून हार्दिक आणि महिका यांच्यातील संभाव्य नात्याबद्दलच्या चर्चांना वेग आला आहे. सोशल मीडियावर अनेक लोक ती व्यक्ती हार्दिक पांड्या असल्याची चर्चा करताना दिसत आहेत. एका सोशल मीडिया युजरने महिकाच्या एका पोस्टमध्ये हार्दिकचा जर्सी क्रमांक ३३ पाहिल्यानंतरही याबाबत चर्चा सुरू केली.
इन्स्टावर दोघेही एकमेकांना करतात फॉलो
हार्दिक आणि महिका दोघेही इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत असल्याचे दिसले. ते लक्षात आल्यानंतर चाहत्यांकडून ही चर्चा अधिक तीव्र झाली. या चर्चांनी आणखी एक गोष्ट लक्षात आणून दिली, ती म्हणजे हार्दिक आणि महिका वेगवेगळ्या चित्रांमध्ये एकाच बाथरोबमध्ये दिसले. यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. तसेच, महिकाच्या ताज्या अपडेट्समध्ये ती दुबईला जात असल्याचीही पोस्ट आहे. सध्या भारतीय संघदेखील दुबईतच आशिया कप खेळत आहे. त्यामुळे अनेक बाबी या गोष्टींना खतपाणी घालताना दिसत आहेत.
Hardik pandya new girlfriendbyu/Own_Influence_1229 inIndiaCricketGossips
हार्दिक पांड्या सध्या आशिया चषक स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात आहे. तो जसप्रीत बुमराहसोबत वेगवान गोलंदाज म्हणून खेळत आहे. तसेच, तो पाचव्या-सहाव्या स्थानी फलंदाजीही करताना दिसत आहे.