Join us

साखरपुड्यानंतर नताशासोबत Romantic मूडमध्ये दिसला हार्दिक, पाहा व्हायरल फोटो

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं 2020च्या पहिल्याच दिवशी घरच्यांसह तमाम चाहत्यांना सुखद धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 10:08 IST

Open in App

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं 2020च्या पहिल्याच दिवशी घरच्यांसह तमाम चाहत्यांना सुखद धक्का दिला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्दिकनं साखरपुडा केल्याचे जाहीर केले. गेले अनेक महिने बॉलिवूडच्या ज्या सुंदरीसोबत नाव जोडलं जात होतं त्या नताशा स्टँकोव्हिचसह हार्दिकनं गुपचुप साखरपुडा केला. नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी निकटवर्तीयांसोबत दुबईत गेलेल्या हार्दिकनं एका बोटवर नताशाला लग्नाची मागणी घातली आणि अंगठी घातली. हार्दिकनं तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून प्रेमाचा जाहीर कबुली दिली.

हार्दिक पंड्याच्या साखरपुड्याची गोष्ट ऐकून त्याच्या वडिलांनाच बसला धक्का, केला मोठा खुलासा...

हार्दिक-नताशा गेली अनेक महिने एकमेकांना डेट करत होते. त्यांना अनेकवेळा एकत्रही पाहिले गेले. दोन महिन्यांपूर्वी हार्दिकनं मुंबईत झालेल्या एका पार्टीमध्ये भाऊ कृणालची नताशाशी ओळख करुन दिली होती. त्यानंतर त्यांच्या प्रेमाचं अंकुर अजून फुललं... नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्दिकनं नताशासोबत साखरपुडा करून प्रेमाची कबुली दिली. हार्दिकनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत दोघंही एकमेकांना किस करताना दिसले होते. पण, या दोघांचा आणखी एक रोमँटिक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

DJ गर्ल ते हार्दिक पांड्याची प्रेयसी; नताशा स्टँकोव्हिचबद्दलच्या 'या' गोष्टी जाणून घ्याच

कृणाल पांड्यानं होणाऱ्या वहिनीचं केलं भन्नाट स्वागत!

नव्या फोटोत हार्दिक-नताशा रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. नताशा हार्दिकच्या कुशीत असल्याचे दिसत आहे. पाहा फोटो..

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिच