कृणाल पांड्यानं होणाऱ्या वहिनीचं केलं भन्नाट स्वागत!

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच यांनी नववर्षाच्या सुरुवातीला दुबईत गुपचुप साखरपुडा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 02:42 PM2020-01-02T14:42:28+5:302020-01-02T14:43:00+5:30

whatsapp join usJoin us
We're so happy to have you join our crazy family, Krunal Pandya welcoming Natasha Stankovic | कृणाल पांड्यानं होणाऱ्या वहिनीचं केलं भन्नाट स्वागत!

कृणाल पांड्यानं होणाऱ्या वहिनीचं केलं भन्नाट स्वागत!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच यांनी नववर्षाच्या सुरुवातीला दुबईत गुपचुप साखरपुडा केला. हार्दिकनं इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून हे जाहीर केले आणि त्यानंतर सर्वांना ही गुड न्यूज समजली. साखरपुडा उरकून हे नवं जोडपं गुरुवारी सकाळी मुंबईत परतले. हार्दिक आणि नताशा यांच्या साखरपुड्याला त्याचा भाऊ कृणाल पांड्याही उपस्थित होता. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करून नताशाचे भन्नाट स्वागत केले. 

हार्दिकनं बोटीवर ( याच) फिल्मी स्टाईलनं नताशाला प्रपोज केले. त्यांच्या या साखरपुड्याला हार्दिकचा भाऊ कृणाल आणि त्याची पत्नी पंखुरी यांच्यासह काही जवळचे मित्र हजर होते. हार्दिकने ही गोड बातमी इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून जाहीर केली. या फोटोखाली त्याने ''मै तेरा, तू मेरी, जाने सारा हिंदुस्थान, अशी कमेंट्स केली आहे. 

ही गोड बातमी देण्यापूर्वी हार्दिकने नववर्षाचे स्वागत गर्लफ्रेंड नताशासोबत केले. तसेच तिच्यासोबतचे एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर करून त्याने त्याखाली एक मजेशीर कमेंट्सही केली होती. ''नव्या वर्षाची सुरुवात मी माझ्या फायरवर्क (फटाका)सोबत करत आहे.'' असे त्या कमेंट्समध्ये त्याने म्हटले होते.

कृणालनं ट्विट केले की,'' हार्दिक आणि नताशा यांचे खूप खूप अभिनंदन. तू या वेड्या कुटुंबाची आता सदस्य होणार आहेत. तुझे स्वागत... दोघांना खूप प्रेम..''

Web Title: We're so happy to have you join our crazy family, Krunal Pandya welcoming Natasha Stankovic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.