Join us

याला काय अर्थ आहे राव! हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; पण मीम्स बनले विराट-अनुष्कावर

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांच्या घरी पाळणा हलला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 16:54 IST

Open in App

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांच्या घरी पाळणा हलला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिकनं त्याला मुलगा झाल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. हार्दिकनं या वर्षाच्या सुरुवातीला दुबईत मोजक्याच मित्रांच्या साक्षीनं नताशासोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर त्यानं लॉकडाऊनच्या काळात नताशा गर्भवती असल्याची बातमी देताना घरच्या घरी लग्न केलं आणि आज त्याला मुलगा झाल्याची गोड बातमी समोर आली. पण, हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या मीम्सचा पाऊस सोशल मीडियावर पडताना दिसत आहे.

 

IPL 2020च्या फायनलची तारीख बदलणार, 8 नोव्हेंबर ऐवजी 'या' तारखेला होणार; पण का?

139 दिवसानंतर आज होणार आंतरराष्ट्रीय वन डे सामना; 29 वर्षांनंतरचा हा सर्वात मोठा ब्रेक!

दुःखद घटना; दिग्गज खेळाडूच्या 22 महिन्यांच्या कन्येचं निधन!

टॅग्स :हार्दिक पांड्याविराट कोहलीअनुष्का शर्मा