Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नाही

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक सध्या गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नाही. इंग्लंडविरुद्ध गोलंदाजीचे ओझे हाताळण्यासाठी त्याला संघात घेण्यात आले होते,

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 01:17 IST

Open in App

मुंबई: आगामी इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका आणि त्याआधीच्या न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी  शुक्रवारी जाहीर झालेल्या भारतीय कसोटी संघात अष्टपैलू हार्दिक पांड्या याला स्थान देण्यात आलेले नाही.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक सध्या गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नाही. इंग्लंडविरुद्ध गोलंदाजीचे ओझे हाताळण्यासाठी त्याला संघात घेण्यात आले होते, मात्र तो प्रयोग फसला. त्यामुळेच कसोटी संघात त्याचा विचार झालेला नाही. प्रसिद्ध कृष्णा आणि गुजरातचा डावुखरा वेगवान गोलंदाज अर्जन यांना चेंडूत अतिरिक्त वेग असल्यामुळे निवडण्यात आले आहे. अर्जनने २०१८ ला प्रथम श्रेणीत पदार्पण केल्यापासून १६ सामन्यात ६२ गडी बाद केले. अक्षर पटेल हा तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून संघात असेल. मर्यादित षटकात शानदार धावा काढणारा मुंबईचा पृथ्वी शाॅ याचा विचार मात्र निवडकर्त्यांनी केला नाही. भुवनेश्वर कुमार फिटनेसमुळे संघात स्थान मिळवू शकला नाही.

टॅग्स :हार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघ