Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक कपिल देव बनू शकत नाही, या चर्चेला अर्थ नाही

भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव आणि विद्यमान संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांडया यांच्यामधील तुलना दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 17:37 IST

Open in App
ठळक मुद्देदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत केप टाऊनच्या उसळी घेणा-या खेळपट्टीवर पांडयाने 93 धावांची खेळी केल्यानंतर या तुलनेला अधिकच जोर चढला. पहिल्या दोन कसोटीत पराभव झाल्यानंतर तिसरी कसोटी गोलंदाजांनी जिंकून दिली.

नवी दिल्ली - भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव आणि विद्यमान संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांडया यांच्यामधील तुलना दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेकजण आतापासूनच हार्दिकची तुलना कपिल देव यांच्याबरोबर करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी दुसरा कपिल देव होऊ शकत नाही असे मत व्यक्त केले आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत केप टाऊनच्या उसळी घेणा-या खेळपट्टीवर पांडयाने 93 धावांची खेळी केल्यानंतर या तुलनेला अधिकच जोर चढला. अशी तुलना करु नये. कारण दुसरा कपिलदेव होऊ शकत नाही. कपिल देव यांनी त्यांच्याकाळात जी मेहनत केली, त्यांच्यावर जी जबाबदारी होती. दिवसाला ते 20 ते 25 षटके गोलंदाजी करायचे. आताही अशा प्रकारची कामगिरी कोणी करु शकत नाही त्यामुळे दुसरा कपिल देव मिळणे कठिण आहे असे अझरुद्दीन म्हणाले. 

पहिल्या दोन कसोटीत पराभव झाल्यानंतर तिसरी कसोटी गोलंदाजांनी जिंकून दिली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना दबावाखाली ठेवले असे अझरुद्दीन म्हणाले.                                                                 

टॅग्स :कपिल देवहार्दिक पांड्या