Join us
Daily Top 2Weekly Top 5

हरभजन सिंग संतापला! अपशब्दांचा मारा करत नेटकऱ्याला सुनावलं; नेमकं काय घडलं?

कॅरेबियन दिग्गजाची स्तुती अन्  हिंदी समालोचकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 18:42 IST

Open in App

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल २०२६ स्पर्धेचा उद्घाटन सामना रंगला. गतविजेत्या आरसीबीने घरच्या मैदानावर दमदार विजय नोंदवत १९व्या पर्वाची शानदार सुरुवात केली. मैदानावरील खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा सुरू असतानाच सोशल मीडियावरील एका कमेंटमुळे माजी फिरकीपटू Harbhajan Singh चांगलाच भडकला. संतापाच्या भरात त्याने नेटकऱ्याला कडक शब्दांत सुनावलं. नेमकं असं काय घडलं की भज्जी इतका संतापला? जाणून घेऊया...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

युवा क्रिकेटरचं कौतुक अन् वादाची ठिणगी

IPL २०२६ च्या हंगामातील सलामीच्या लढतीत आरसीबीच्या संघाकडून देवदत पडिक्कल आणि विराट कोहलीचा जलवा पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून पहिल्यांदा नेतृत्व करताना ईशान किशन याने फलंदाजीतील कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले. या स्टार फलंदाजांशिवाय अनकॅप्ड भारतीय खेळाडू अनिकेत वर्मानं आपल्या तुफान फटकेबाजीसह सर्वांचे लक्षवेधून घेतले. त्याने १८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ४३ धावांच्या खेळीसह नवा स्टार IPL गाजवण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले. या युवा क्रिकेटरचं इयान बिशप यांनी केलेल्या कौतुकाच्या मुद्यावरून एका नव्या वादाला तोंड फुटल्याचे पाहायला मिळाले. 

दोन, तीन नाही IPLमधील तब्बल ९ संघांकडून खेळलाय हा फलंदाज, रचला खास विक्रम, कोण आहे तो?

कॅरेबियन दिग्गजाची स्तुती अन्  हिंदी समालोचकांना टोला

RCB विरुद्ध SRH यांच्यातील लढतीनंतर समालोचक इयान बिशन यांनी अनिकेतची प्रेरणादायी कहाणी सांगितली. अनिकेत फक्त ३ वर्षांचा असताना त्याच्या आईचं निधन झालं. त्यानंतर तो आपल्या काकांसोबत भोपाळला गेला आणि तिथेच त्याने क्रिकेटची सुरुवात केली. भारतीय खेळाडूंबद्दल ही माहिती असल्यामुळे इयान बिशप यांची सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे. त्यांचा दाखला देत एका सोशल मीडिया वापरकर्त्याने हिंदी समालोचकांवर टीका केली. Homie नावाच्या एका वापरकर्त्याने, "इयान बिशप हिंदी छपरी कॉमेंटटरपेक्षा अधिक भारतीय असल्याचे वाटते." अशा शब्दांत कॅरेबियन दिग्गजाची स्तुती केली. हरभजन संतापला; राग अनावर झाल्यावर अपशब्दांचा मारा

त्या वारकर्त्याच्या पोस्टवर हरभजान सिंग भडकला. त्यांने यावर प्रत्युत्तर देताना “हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार” असा टोला लगावला. त्यानंतर त्या वापरकर्त्याने आर. अश्विनसोबत ईर्षा केलीस म्हणून करिअर संपले. आता कॉमेंट्री तरी नीट कर नाहीतर इथूनही गाशा गुंडाळावा लागेल, असा टोला हरभजन सिंगला हाणला. यावर हरभजन सिंगने अपशब्दात त्याच्यावर राग काढल्याचे पाहायला मिळाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Harbhajan Singh Loses Cool, Abuses Netizen After Criticism on Commentary

Web Summary : Harbhajan Singh lashed out at a netizen criticizing his commentary following praise for young cricketer Aniket Verma. A user's comparison to Ian Bishop triggered a heated exchange with Singh responding aggressively.
टॅग्स :आयपीएल २०२६हरभजन सिंगविरेंद्र सेहवागनवज्योतसिंग सिद्धूआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग