Join us

भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटून शेअर केली त्यामागची स्टोरी

श्रीसंतच्या लेकीसमोर भज्जीची 'खलनायक' अशी छबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 14:12 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग आणि जलदगती गोलंदाज श्रीसंत यांच्यात IPL च्या रिंगणात झालेली वादग्रस्त घटना आजही क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहे. २००८ च्या पहिल्या हंगामात MI कडून खेळणाऱ्या हरभजन सिंगनं भर मैदानात श्रीसंतला (पंजाब संघात) थप्पड मारली होती. क्रिकेटच्या मैदानातील हे एक गाजलेले प्रकरण आहे. आपली चूक मान्य करत हरभजन सिंगने एकदा नव्हे तर अनेकदा जगजाहिरपणे माफीही मागितलीये. श्रीसंतनही त्याला माफ केलय. पण एक व्यक्ती अशी आहे, जी आजही भज्जीच्या त्या गोष्टीवर मनात राग धरून आहे. ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे श्रीसंतची लेक सानविका. खुद्द हरभजन सिंगनेच हा किस्सा शेअर केला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आर. अश्विनसोबत गप्पा गोष्टी करताना भज्जीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट

आर. अश्विनसोबत गप्पा गोष्टी करताना हरभजन सिंग याने आयपीएलच्या मैदानात श्रीसंतला मारलेली 'थप्पड', ही क्रिकेट कारकिर्दीतील एक मोठी चूक होती, असे म्हटले आहे. माझ्या कारकिर्दीतील हा एक वाईट प्रसंग होता. जे घडलं ते व्हायला नको होते. त्याने मला उसाकवले, मला मी एवढ्या टोकाचे पाऊल उचलायला नको होते.  या चुकीबद्दल मी २०० वेळा माफी मागितली आहे, अशा आशयाच्या वक्तव्यासह भज्जीने या जुन्या प्रकरणात पुन्हा एकदा श्रीसंतची माफी मागितली.

भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...

श्रीसंतच्या लेकीसमोर भज्जीची 'खलनायक' अशी छबी

यावेळी हरभजन सिंगनं या घटनेसंदर्भातील एक खास किस्साही शेअर केला आहे. तो म्हणाला की, मी एकदा श्रीसंतच्या मुलीला भेटलो. मी तिच्याशी खूप प्रेमानं बोलत होतो. पण ती माझ्याशी बोलायला तयार नव्हती. तुम्ही माझ्या बाबांना मारलंय, त्यामुळे मला तुमच्याशी बोलायचं नाही, असा रिप्लाय आला. माझ्या कृतीचा बाल मनावर झालेला परिणाम बघून मला अक्षरश: रडू आले होते. श्रीसंतच्या लेकीसमोर उभी राहिलेली खलनायकाची छबी मला धक्का देणारी होती. ज्यावेळी ती मोठी होईल, त्यावेळी कदाचित ती मला समजू शकेल, असेही फिरकीपटू यावेळी म्हणाला आहे.

टॅग्स :हरभजन सिंगश्रीसंतआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीगमुंबई इंडियन्सपंजाब किंग्सऑफ द फिल्ड