ठळक मुद्देहरभजन सिंग सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असतोकाही दिवासंपूर्वी त्यानं असाच एक झिंगाट डान्स करणाऱ्या मुलाचा व्हिडीओ पोस्ट केला होता
जगभरातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत जगभरात 87 लाख 66,035 कोरोना रुग्ण आढळले असून 46 लाख 27,883 रुग्ण बरे झाले आहेत. पण, दुर्दैवानं 4 लाख 62,691 रुग्णांना जीव गमवावा लागला. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 96,182 इतकी झाली असून 2 लाख 14,209 रुग्ण बरे झाले आहेत. 12970रुग्णांचे निधन झाले आहे. कोरोनाच्या संकटात लोकांना रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यासाठी सोशल मीडियावर सध्या उपाय सुचवले जात आहेत. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यानंही शनिवारी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 20 सेकंदाच्या व्यायामाचा व्हिडीओ पोस्ट केला. पण, हा 20 सेकंदाचा व्यायाम सहज जमेल असे वाटत नाही.
हरभजन सिंग सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह राहतो. त्यामुळे त्याच्या फॉलोअर्सना रोज काही ना काही नवीन पाहायला मिळते. शनिवारी भज्जीनं एक व्हिडीओ पोस्ट केला आणि तो बघता बघता तुफान व्हायरल झाला आहे. पाहा व्हिडीओ आणि बघा तुम्हाला हा 'सोपा' व्यायाम जमतो का?
याआधी भज्जीनं झिंगाट डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला होता. सोशल मीडियावर सध्या एका मुलाचा डान्स तुफान व्हायरल होत आहे. सिंगनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर त्यानं लिहिलं की,''साबण लावता लावता डान्स कसा करावा, ते शिका.'' व्हिडीओतील मुलगा ज्या प्रकारे डान्स करतोय, ते पाहून खरंच तो शरिरावर साबण लावता लावता डान्स करतोय असं वाटतं. हा व्हिडीओ पाहून भज्जी नक्की लोटपोट झाला असेल.
20 सेकंदाच्या व्हिडीओत तो मुलगा ढोल ताशाच्या तालावर बेभान होऊन नाचत आहे. त्यात एक महिला हाताता पैसे घेऊन त्याची आरती ओवाळायला येते, पण तो एवढा बेभान होता की त्यानं जे केलं, ते पाहून सर्वांना हसू आवरता आले नाही. हा व्हिडीओ फार जूना आहे, परंतु भज्जीनं तो शेअर केल्यांनं पुन्हा त्याची हवा झाली आहे. आतापर्यंत 30 हजाराहून अधिका लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
चिनी स्पॉन्सर्सबाबत IPL गव्हर्निंग काऊंसिल मोठा निर्णय घेणार? बोलावली तातडीची बैठक
युजवेंद्र चहल अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही; पोस्ट केला वेदनादायक फोटो