'दादा' गांगुली की 'कूल' धोनी?... हरभजन सिंगने ड्रीम-11 संघाचा कर्णधार कुणाला केलंय माहित्येय?

भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने त्याचा ड्रीम वर्ल्ड इलेव्हन संघ सोमवारी जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 13:42 IST2019-06-03T13:42:24+5:302019-06-03T13:42:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Harbhajan Singh picks MS Dhoni as captain of his 'dream world XI' | 'दादा' गांगुली की 'कूल' धोनी?... हरभजन सिंगने ड्रीम-11 संघाचा कर्णधार कुणाला केलंय माहित्येय?

'दादा' गांगुली की 'कूल' धोनी?... हरभजन सिंगने ड्रीम-11 संघाचा कर्णधार कुणाला केलंय माहित्येय?

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने त्याचा ड्रीम वर्ल्ड इलेव्हन संघ सोमवारी जाहीर केला. त्याने मनात कोणतीच शंका न ठेवता या संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावर सोपवले. वन डे आणि ट्वेंटी-20 वर्ल्डकपसह आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांत जेतेपद पटकावणारा धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे.  

यष्टिरक्षक-फलंदाज धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. शिवाय 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. 2007 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011 चा वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघात हरभजन सदस्य होता. भज्जी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळतो. 



तो म्हणाला,''कोणतीही शंका न ठेवता माझा कर्णधार हा धोनीच असेल. सौरव गांगुलीनंतर जगात सर्वोत्तम कर्णधार असेल तर तो धोनीच. सध्याच्या घडीलाही धोनीसारखा चतुर कर्णधार नाही. गेल्या दोन वर्षांपासून मी आयपीएलमध्ये त्याच्यासह खेळत आहे. धोनीइतकी सामन्याची जाण असलेला कर्णधार जगात शोधून सापडणार नाही. तो दहा पाऊलं पुढे आहे.'' 

Web Title: Harbhajan Singh picks MS Dhoni as captain of his 'dream world XI'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.