Join us

#HappyBirthday Yuvi : क्रिकेटचा 'हिरो' युवराजच्या बॉलीवूड तारकांसोबतच्या गाजलेल्या 'इनिंग्ज'

युवराज जसा क्रिकेटच्या मैदानात चमकला तसा प्रणयाच्या मैदानातही त्याची एकेकाळी धुम होती. त्याची बरीच अफेअर्स बॉलीवूडमध्ये झाली. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 13:49 IST

Open in App

मुंबई : युवराज सिंगचे हॉलीवूड स्टार हेजेल किच हिच्याबरोबर आता लग्न झालेले असले तरी त्याची बॉलीवूडमधली अफेअर्स चांगलीच गाजली. युवराज जसा क्रिकेटच्या मैदानात चमकला तसा प्रणयाच्या मैदानातही त्याची एकेकाळी धुम होती. त्याची बरीच अफेअर्स बॉलीवूडमध्ये झाली. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का...

मोहब्बतें या सिनेमातील किम शर्मा या अभिनेत्रीबरोबर त्याचे पहिले अफेअर झाले. हे अफेअर जवळपास चार वर्षे चालले, त्यानंतर या दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला. दीपिका पदुकोणबरोबरही त्याचे नाव जोडले गेले. हे दोघे बऱ्याचदा पार्टी करताना पाहिले गेले. त्याचबरोबर युवीचा सामना बघायला दीपिकाही मैदानात हजेरी लावायची.

आयपीएलमध्ये युवराज किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत होता. त्यावेळी संघाची मालकिण प्रीती झिंटाबरोबर त्याचे अफेअर असल्याची चर्चा होती. आयपीएलच्या पार्ट्यांमध्ये या दोघांचे बरेच फोटो वायरल झाले होते. बॉलीवूडमधील रिया सेनबरोबरही तो रिलेशनशिपमध्ये होता, असे म्हटले गेले होते. मिनीषा लांबा आणि सुपर मॉडल आंचल कुमार यांच्याबरोबरही युवराजचे नाव जोडले गेले होते.

 

टॅग्स :युवराज सिंगप्रीती झिंटा