ICC Under 19 World Cup 2026 Final : वारसा जपला! ट्रॉफी उंचावल्यावर आयुष म्हात्रेला आठवली रोहित अन् हरमन जोडी, म्हणाला...

U19 वर्ल्ड कप स्पर्धेतील ऐतिहासिक विजयानंतर काय म्हणाला आयुष म्हात्रे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 23:37 IST2026-02-06T23:19:19+5:302026-02-06T23:37:31+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Happy To Carry Forward Rohit Sharma Harmanpreet Kaur's Legacy Ayush Mhatre Chuffed After U19 WC Victory | ICC Under 19 World Cup 2026 Final : वारसा जपला! ट्रॉफी उंचावल्यावर आयुष म्हात्रेला आठवली रोहित अन् हरमन जोडी, म्हणाला...

ICC Under 19 World Cup 2026 Final : वारसा जपला! ट्रॉफी उंचावल्यावर आयुष म्हात्रेला आठवली रोहित अन् हरमन जोडी, म्हणाला...

Ayush Mhatre On U19 WC Victory : भारताच्या अंडर-१९ संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांचा वारसा जपत भारतीय संघाला वर्ल्ड चॅम्पियन करून दाखवलं आहे. झिम्बाब्वे येथील हरारे स्पोर्ट्स, हरारेच्या मैदानात रंगलेल्या फायनलमध्ये इंग्लंडला १०० धावांनी पराभूत करत त्याने अंडर १९ भारतीय संघाला सहावे जेतेपद मिळवून दिले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर टीम इंडियाचं उज्वल भविष्य असलेल्या आयुष म्हात्रेनं भारतीय संघाचा माजी कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा आणि भारतीय महिला संघाले जगजेत्ता करणाऱ्या हरमनप्रीत कौरचा वारसा जपल्याचा आनंद असल्याची गोष्ट बोलून दाखवली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

क्रिकेट जगतात भारताचा दबदबा! 

 भारताच्या या सुवर्णयुगाची सुरुवात २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-२० वर्ल्ड कप जिंकून झाली. त्यानंतर २०२५ मध्ये निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली भारताच्या U-19 महिला संघाने टी-२० वर्ल्ड कप पटकावला. याच वर्षी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय वरिष्ठ महिला संघाने मायदेशात ODI वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला होता. आता आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी आयुष म्हात्रेनं भारतासाठी आणखी एक वर्ल्ड कप जिंकून देत क्रिकेट जगतात भारताचा दबदबा असल्याचे सिद्ध केले आहे.

Under 19 World Cup 2026: अंडर-१९ वर्ल्डकपवर भारताचे नाव! फायनलमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्य...

U19 वर्ल्ड कप स्पर्धेतील ऐतिहासिक विजयानंतर काय म्हणाला आयुष म्हात्रे?

इंग्लंडविरुद्धच्या फायनलमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर आयुष म्हात्रे म्हणाला की, "माझ्या भावना शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. हा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. संपूर्ण स्पर्धेत संघाने अप्रतिम खेळ केला. जे ठरवले होते ते अगदी अचूकपणे साध्य करुन दाखवले. रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांचा वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदाचा वारसा जपण्यात यशस्वी ठरलो, याचा आम्हाला अभिमान वाटतो."

वैभव सूर्यवंशीचं तोंडभरून कौतुक

वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीसंदर्भात आयुष म्हात्रे म्हणाा की, तो (सूर्यवंशी) थांबतच नव्हता. त्याच्या खेळी निशब्द करणारी आहे.  तो किती उत्कृष्ट फलंदाज आहे, हे त्याने आज दाखवून दिलं. हीच वृत्ती आपण कायम ठेवली पाहिजे. कदाचित भविष्यात आम्ही सगळे एकाच संघात खेळणार नाही, पण ही मानसिकता पुढे घेऊन जाणं महत्त्वाचं आहे,"
 

Web Title : ICC U19 विश्व कप 2026: भारत जीता, आयुष म्हात्रे को रोहित, हरमन याद आए!

Web Summary : आयुष म्हात्रे के नेतृत्व में भारत ने अंडर-19 विश्व कप जीता, रोहित शर्मा और हरमनप्रीत कौर को जीत समर्पित की। भारत ने इंग्लैंड को 100 रनों से हराया, छठा खिताब हासिल किया। म्हात्रे ने वैभव सूर्यवंशी के शानदार प्रदर्शन की सराहना की, भविष्य के लिए अपनी विजयी मानसिकता बनाए रखने के महत्व पर जोर दिया।

Web Title : ICC U19 World Cup 2026: India wins, Ayush Mhatre remembers Rohit, Harman!

Web Summary : Ayush Mhatre led India to victory in the U19 World Cup, dedicating the win to Rohit Sharma and Harmanpreet Kaur. India defeated England by 100 runs, securing their sixth title. Mhatre praised Vaibhav Suryavanshi's outstanding performance, emphasizing the importance of maintaining their winning mentality for the future.