Join us  

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली येताच, शरद पवार म्हणतात...

सौरव गांगुलीच्या रुपानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) 60-65 वर्षांनी अध्यक्ष म्हणून क्रिकेटपटू मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 9:44 AM

Open in App

सौरव गांगुलीच्या रुपानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) 60-65 वर्षांनी अध्यक्ष म्हणून क्रिकेटपटू मिळाला. माजी कर्णधार गांगुलीच्या कार्यकाळात बीसीसीआय आणि माजी खेळाडूंना अच्छे दिन येतील अशी सर्वांना अपेक्षा आहे. गांगुलीनंही त्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. गांगुलीची अध्यक्षपदावरी निवड ही नाट्यमयरित्या झाली असली तरी आजी-माजी खेळाडूंसाठी एक आशेचा किरण घेऊन येणारी नक्कीच आहे. त्यामुळेच अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होताच भारतीय क्रिकेटपटूंनी दादाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

माजी फलंदाज सचिन तेंडुलकर म्हणाला,''अभिनंदन दादा... भारतीय क्रिकेटची तू जशी सेवा करत आला आहेस, तशीच यापुढेही करशील याची खात्री आहे.'' वीरेंद्र सेहवागनें लिहिले की,''अभिनंदन दादा. देर है अंधेर नही.. भारतीय क्रिकेटमध्ये सकारात्मक पाऊल. भारतीय क्रिकेटसाठी तू बरंच योगदान दिले आहेस आणि त्यात अधिक भर पडेल, याची खात्री आहे.'' माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यानेही गांगुलीचं अभिनंदन केले. तो म्हणाला,''बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्याबद्दल गांगुली तुझे अभिनंदन. तुझ्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यश मिळवले आणि येथेही तू त्याचीच पुनरावृत्ती करशील याची खात्री आहे. नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा.''

 

पण, यात बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरली. पवार यांनी 2005 ते 2008 या कालावधीत बीसीसीआयचे अध्यक्षपद भुषविले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी गांगुलीच्या बीसीसीआय अध्यक्षपदावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,''बीसीसीआयची जबाबदारी एका क्रिकेटपटूकडे गेल्याचा आनंद आहे. गांगुली गेली 4-5 वर्ष बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि त्याच्याकडे क्रिकेटपटू व प्रशासकिय असा दोन्ही अनुभव आहे. त्यामुळे तो बीसीसीआयचा कारभार सक्षमपणे सांभाळू शकतो. त्याच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेट अधिक चांगली कामगिरी करेल.''

अमित शहा आणि सौरव गांगुली यांच्यातील भेटीमध्ये नेमकं घडलं काय होतं...

बीसीसीआयचा अध्यक्ष निवडण्यात अमित शहांचा होता का हात, सांगतोय सौरव गांगुली

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची टीम झाली घोषित, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी

BCCIच्या मुख्यालयात सौरव गांगुलीला आवरला नाही 'त्या' फोटोसोबत सेल्फी घेण्याचा मोह!

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआयशरद पवार