Did Amit Shah have a hand in electing the BCCI president, says Sourav Ganguly | बीसीसीआयचा अध्यक्ष निवडण्यात अमित शहांचा होता का हात, सांगतोय सौरव गांगुली

बीसीसीआयचा अध्यक्ष निवडण्यात अमित शहांचा होता का हात, सांगतोय सौरव गांगुली

मुंबई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली विराजमान होणार आहे. एका मोठ्या नेत्याने आपले वजन वापरून गांगुलीचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा केल्याचे म्हटले जात आहे. हे मोठे नेते म्हणजे भारताचे गृहमंत्री अमित शहा असल्याचे बऱ्याच जणांचे म्हणणे आहे. पण बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणारा गांगुली याबद्दल काय बोलतोय, ते जाणून घ्या...

बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. पण अमित शहा यांनी आपेल वजन वापरले आणि गांगुलीला अध्यक्षपदावर विराजमान केले, असे म्हटले जात आहे.

याबाबत गांगुली म्हणाला की, " मला रात्री साडे अकरावाजेपर्यंत माहिती नव्हते की, मी बीसीसीआयचा अध्यक्ष होणार आहे. पण तरीही मी बीसीसीआयचा अध्यक्ष होणार आहे. अनुराग ठाकूर यांनी माझी भरपूर मदत केली. पण गृहमंत्री अमित शहा यांचाही मला निवडण्यात हातभार होता, हे मला माहिती नाही. बीसीसीआयचा अध्यक्ष निवडण्यात नेमकी अमित शहा यांची काय भूमिका होती, हे मला माहिती नाही."

बीसीसीआयवर आपल्या गटाचे नियंत्रण असावे, यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी जोर लावला होता. अखेरीस सौरव गांगुलीच्या नावावर एकमत झाले. बृजेश पटेल यांना आयपीएलचे चेअरमन बनवण्यावर एकमत झाले. अमित शहांचे चिरंजीव जय शहा यांची सचिवपदी निवड झाली तर अरुण सिंह ठाकूर यांची खजिनदारपदी निवड झाली.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली विराजमान होणार आहे. बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. पण एका मोठ्या नेत्याने आपले वजन वापरून गांगुलीचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा केल्याचे म्हटले जात आहे.

बीसीसआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना ब्रिजेश पटेल यांना अध्यक्षपदावर विराजमान करायचे होते. त्यांच्यासमोर बीसीसीआयचे माजी पदाधिकारी अनुराग ठाकूर यांचे कडवे आव्हान होते. पण यावेळी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपले वजन वापरल्याचे म्हटले जात आहे. अमित शहा यांच्या म्हणण्यानंतर गांगुलीला बीसीसीआयचे अध्यक्षपद देण्यात आले, असे म्हटले जात आहे. नॅशनल हेराल्ड या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Did Amit Shah have a hand in electing the BCCI president, says Sourav Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.