भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आज त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. 'हिटमॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकला आणि भारताच्या आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. सध्या रोहित शर्मा आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.
टी-२० विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या तो भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट संघाचे नेतृ्त्त्व करत आहे. रोहितला जगातील महान फलंदाजांपैकी एक मानले जाते. पंरतु, यापर्यंत पोहोचणे त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. परंतु, त्याने जिद्द सोडली नाही आणि जगाला दाखवून दिले की, त्याची गणना जगातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये का केली जाते.
रोहित शर्मा १२ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी मित्रांकडून उसने पैसे घेऊन त्याला बोरिवली येथील क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केले. अकादमीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहित शर्माला खेळताना पाहिले. त्यावेळी रोहित ऑफ-स्पिन गोलंदाजी करायचा. रोहितची गोलंदाजी पाहून दिनेश लाड यांनी त्याच्या काकांशी बोलून रोहितला स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश मिळवून दिला. एके दिवशी, दिनेश लाड यांनी रोहितला फलंदाजी करताना पाहिले. त्यावेळी त्यांना कळून चुकले की, रोहित गोलंदाजीसह चांगली फलंदाजीही करू शकतो. लाड यांनी रोहितच्या फलंदाजीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. रोहितने अंडर-१६ संघासाठी टेस्ट दिली. पण त्याची निवड झाली नाही. रोहितला सुरुवातीला अपयशाला सामोरे जावे लागले. पुढे रोहितने दमदार कामगिरीच्या जोरावर अंडर-१७ संघात स्थान मिळवले. त्यानंतर रोहितने कधीच मागे वळून पाहिले नाही.
क्रिकेट किटसाठी दूध विकले
मिडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माच्या आई- वडिलांची कमाई फारशी नव्हती. त्यामुळे क्रिकेट होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोहित शर्मा त्याच्या आजोबांकडे राहत होता. रोहितने क्रिकेट कीट घेण्यासाठी दूधही विकल्याचे सांगितले जाते. याबाबत त्याच्या अनेक चाहत्यांनाही माहिती नसेल.
भारताचा यशस्वी कर्णधार
भारताच्या यशस्वी कर्णधारामध्ये रोहित शर्माची गणना केली जाते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्यानंतर २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनंतर भारतासाठी सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकलेल्या कर्णधारामध्ये रोहित शर्माचे नाव घेतले जाते. धोनीच्या नेतृत्त्वात भारताने आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकल्या आहेत.
Web Title: Happy Birthday Rohit Sharma: Mumbai Indians legend turns 38
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.