Join us

Happy Birthday Ishant : जेव्हा इशांत शर्मा भडकून जेवण सोडून गेला होता...

इशांत शर्मा एकदा चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला होता, कधी तुम्हाला माहिती आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 13:14 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघातील 'लंबू' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इशांत शर्माचा आज  31वा वाढदिवस आहे. भारताच्या या वेगवान गोलंदाजाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत एक इतिहास रचला आहे. इशांतने कपिल देव यांचा विक्रम मोडत विदेशामध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा विक्रम रचला आहे. पण इशांत शर्मा एकदा चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला होता, कधी तुम्हाला माहिती आहे का...

इशांतने 2007 साली बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. त्यानंतर इशांतने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये आपले स्थान राखले आहे. इशांतचा हा 92वा कसोटी सामना आहे. आतापर्यंत 92 सामन्यांमध्ये इशांतने 277 विकेट्स मिळवले आहे.

भारतीय संघ 2014 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. यावेळी इशांत शर्मा लंच न करताच बाहेर पडला होता. इशांतला शाकाहारी पदार्थ हवे होते. पण लंचमध्ये एकही शाकाहारी पदार्थ नव्हता. त्यावेळी इशांत चांगलाच भडकला होता. रागाच्या भरात तो तिथून निघून गेल्याचे पाहायला मिळाले होते.

टॅग्स :इशांत शर्माकपिल देव