Join us

Happy Birthday Dada : भारतीय क्रिकेटपटूंचा अ‍ॅटिट्यूड बदलणाऱ्या सौरव गांगुलीला क्रीडा विश्वातून वाढदिवसाच्या शुभेच्छा

वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, हरभजन सिंग आदी अनेक प्रतिभावान खेळाडूंना संधी देत गांगुलीनं टीम इंडियाची बांधणी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 12:27 IST

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा आज 48 वा वाढदिवस आहे. भारतीय क्रिकेटपटूंचा अॅटिट्यूड बदलणाऱ्या, भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती निर्माण करणाऱ्या बंगाल टायगर, दादा अर्थात सौरव गांगुलीवर क्रीडा विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परदेशात यजमान संघाच्या नाकावर टिच्चून विजय कसा मिळवायचा आणि त्याचं सेलिब्रेशनही कसं दणक्यात करायचं, हे दादानं टीम इंडियाला शिकवलं. 

वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, हरभजन सिंग आदी अनेक प्रतिभावान खेळाडूंना संधी देत गांगुलीनं टीम इंडियाची बांधणी केली. 2003चा वर्ल्ड कप आणि त्याआधीची 2002ची नेटवेस्ट सीरिज आजही क्रिकेट चाहत्यांच्या चांगल्या लक्षात आहेत. जशास तसे, आरे का कारे असा स्वभाव असलेल्या गांगुलीनं चुकीसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची कानउघडणीही केली. त्यामुळेच टीम इंडियात दादाचा वेगळाच दरारा होता. 

गांगुलीनं 113 कसोटी आणि 311 वन डे सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं. कसोटीत त्यानं 42.18च्या सरासरीनं 16 शतकांसह 7212 धावा केल्या. 1996ला पदार्पणाच्या सामन्यातच त्यानं शतक झळकावलं होतं. कसोटीत त्याच्या नावावर 35 अर्धशतकं आणि 32 विकेट्सही आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्यानं 40.73च्या सरासरीनं 11363 धावा चोपल्या आणि त्यात 22 शतकं व 72 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्यानं वन डेत 100 विकेट्सही घेतल्या आहेत.  

 

टॅग्स :सौरभ गांगुलीसचिन तेंडुलकरविराट कोहलीसुरेश रैना