Join us

धक्कादायक : नेत्याच्या मुलावर ओरडणं भारतीय क्रिकेटपटूला पडलं महागात, द्यावा लागला राजीनामा

भारतीय क्रिकेटमध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप काही नवा नाही... बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या निवडीवरून विरोधक अनेकदा सवाल करताना दिसले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 15:05 IST

Open in App

भारतीय क्रिकेटमध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप काही नवा नाही... बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या निवडीवरून विरोधक अनेकदा सवाल करताना दिसले आहेत. पण, आज जी घटना समोर आली ती भारतीय क्रिकेटसाठी धक्कादायक म्हणावी लागेल. भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज आणि आंध्र प्रदेश संघाचा कर्णधार हनुमा विहारी ( Hanuma Vihari) याच्याबाबत एक धक्कादायक घटना घडली. रणजी करंडक स्पर्धेदरम्यान संघाचे नेतृत्व करताना तो काही कारणामुळे एका खेळाडूवर ओरडला... तो खेळाडू राजकीय नेत्याचा मुलगा निघाला आणि त्याने विहारीची तक्रार राज्य संघटनेकडून त्याचा राजीमाना घेण्यास सांगितले..

हनुमा विहारीने इंस्टा पोस्ट लिहिली की, ही पोस्ट मी मुद्दाम लिहित आहे. मागील काही दिवसांपासून माझ्याबाबत काही गोष्टी चर्चेत आल्या होत्या आणि त्याबाबत मला तथ्य मांडायचे आहे.  बंगालविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मी  संघाचा कर्णधार होतो, त्या सामन्यादरम्यान मी १७व्या खेळाडूला ओरडले आणि त्याने त्याच्या वडिलांकडे ( जे एक राजकारणी आहेत) तक्रार केली. त्याच्या वडिलांनी असोसिएशनला माझ्यावर कारवाई करण्यास सांगितले. मागील रणजी करंडक स्पर्धेतील उपविजेत्या बंगालविरुद्ध आम्ही ४१० धावांचा यशस्वी पाठलाग केला, तरी माझी कोणतीही चूक नसताना मला कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले. मी खेळाडूवर वैयक्तिक टीका केली नव्हती. गेल्या ७ वर्षांत आंध्र प्रदेशला ५ वेळा बाद फेरीत नेले आणि भारतासाठी १६ कसोटी खेळल्या आहेत. या कालावधीत मी कोणत्याच खेळाडूवर उगाच चिडलेलो नाही. 

त्याने पुढे लिहिले की, पण, या घडनेनंतर मला आंध्रप्रदेश संघाकडून खेळताना लाज वाटत होती, पण मी या हंगामात खेळत राहण्याचे एकमेव कारण म्हणजे मी हा खेळ आणि माझ्या संघाचा आदर करतो. दुःखाचा भाग असा आहे की असोसिएशनला वाटते की खेळाडूंनी त्यांचे सर्व ऐकावे आणि त्यांच्यामुळे खेळाडू आहेत. मला अपमानित आणि लाज वाटली, पण मी आजपर्यंत ती व्यक्त केली नाही. मी ठरवले आहे की मी आंध्रसाठी कधीही खेळणार नाही जिथे,  मी माझा स्वाभिमान गमावला आहे. 

विहारीने भारताकडून १६ कसोटींत ८३९ धावा केल्या आहेत. त्याने १ शतक व ५ अर्धशतकं झळकावली आहेत. १२४ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २४ शतकं व ४९ अर्धशतकांसह ९३२५ धावा केल्या आहेत. नाबाद ३०२ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ९७ सामन्यांत ५ शतकं व २४ अर्धशतकांसह ३५०६ आणि ८९ ट्वेंटी-२०त १८७०  धावा केल्या आहेत.  

टॅग्स :रणजी करंडकबीसीसीआयआंध्र प्रदेशऑफ द फिल्ड