Handshake Drama Returns At U 19 World Cup India vs Bangladesh Match : अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेतील भारत-बांगलादेश यांच्यातील लढत बुलावायो येथील क्विन्स स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्या दरम्यान टॉसच्या वेळी अलीकडच्या काही दिवसांत भारत-पाकिस्तान सामन्यांत जे चित्र पाहायला मिळाले त्याची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले. भारताकडून टॉससाठी कर्णधार आयुष म्हात्रे मैदानात उतरला. दुसऱ्या बाजूला बांगलादेशच्या संघाकडून कर्णधार अजीजुल हकीमच्या जागी उप कर्णधार जवाद अबरारने टॉसला आला. पण परंपरेनुसार दोन्ही कर्णधारांनी एकमेकांशी हस्तांदोलन करणं टाळले. हा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत-बांगलादेश यांच्यातील तणाव; अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत नो हँडशेक पॉलिसी
भारत आणि बांगलादेश यांच्यातील अलीकडचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात भारतात मोठा रोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला आयपीएल- २०२६ च्या हंगामातून आउट केले आहे. बीसीसीआयची ही भूमिका बांगलादेश क्रिकेट बोर्डाला खटकली. परिणामी त्यांनी आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विश्वचषक स्पर्धेतील सामने भारताबाहेर खेळवण्याची विनंती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे केली आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. पण या सर्व गोष्टीचे पडसाद आयसीसीच्या अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेतही उमटल्याचे पाहायला मिळत आहेत.
वैभव सूर्यवंशीचा नवा विश्वविक्रम; विराटलाही टाकलं मागं, 'अशी' कामगिरी करणारा तिसरा भारतीय!
आशिया चषक स्पर्धेपासून भारतीय क्रिकेट संघाने घेतली आहे ही भूमिका
आशिया कप २०२५ च्या स्पर्धेपासून भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलना संदर्भातील ठाम भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले होते. हा मुद्दा चांगलाच गाजला. त्यानंतर क्रिकेटच्या मैदानात महिला संघ असो वा १९ वर्षांखालील भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध हेच चित्र प्रत्येक सामन्यावेळी दिसले. आता तिच गोष्ट भारत-बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान पाहायला मिळाली आहे. आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेश भारतात येऊन खेळायला तयार होणार का? हा मुद्दा गाजत असताना अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेतील नो हँडशेक पॉलिसीच्या गोष्टीची भर पडली आहे.
Web Summary : India-Bangladesh U19 World Cup match saw captains avoid handshake, mirroring India-Pakistan encounters. Tensions exist due to alleged anti-Hindu violence in Bangladesh and BCCI decisions, potentially affecting future tournaments hosted in India.
Web Summary : भारत-बांग्लादेश अंडर-19 विश्व कप मैच में कप्तानों ने हाथ मिलाने से परहेज किया, जो भारत-पाकिस्तान मुकाबलों की याद दिलाता है। बांग्लादेश में कथित हिंदू विरोधी हिंसा और बीसीसीआई के फैसलों से तनाव है, जिससे भारत में होने वाले टूर्नामेंट प्रभावित हो सकते हैं।