Join us  

IPL 2023 PBKS vs GT Live अत्यंत चुरशीचा सामन्यात गुजरातचा विजय, ५ व्या चेंडूवर चौकार

प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने गुजरात टायटन्ससमोर १५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 11:33 PM

Open in App

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील १८ वा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि गुजरात टायटन्स यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला. शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने ६ गडी राखून सामना जिंकला. २० व्या षटकातील ५ व्या चेंडूवर राहुल टेवटियाने सॅम कुरनला चौकार ठोकला अन् गुजरातने विजयी लक्ष्य पार केलं. प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने गुजरात टायटन्ससमोर १५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. 

मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन्सच्या मैदानावर सर्वप्रथम फलंदाजासाठी उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने  २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १५३ धावा केल्या होत्या. पंजाबच्या १५३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सने केवळ १ चेंडू आणि ६ गडी राखत सामना जिंकला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने ४९ चेंडूत सर्वाधिक ६७ धावा केल्या आहेत. 

शेवटच्या षटकात राहुल टेवटियाने चौकार ठोकल्यामुळे गुजरातचा विजय झाला. दरम्यान, पंजाबकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक ३६ धावा केल्या होत्या.  

टॅग्स :किंग्स इलेव्हन पंजाबआयपीएल २०२३गुजरात टायटन्सशुभमन गिल
Open in App