Join us  

Ind vs Eng: देशात क्रिकेटचे सर्वात जास्त चाहते गुजरातमध्ये, सुनील गावस्करांचं विधान

India vs England, 3rd Test, Narendra Modi Stadium: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी अहमदाबादमधल्या नव्या स्टेडियमबाबत बोलताना एक अजब दावा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 5:05 PM

Open in App

Ind vs Eng, 3rd Test, Narendra Modi Stadium: भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असून भारतीय संघानं सामन्यात चांगली सुरुवात देखील केली आहे. कसोटीच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं आहे. पहिल्या सत्रानंतरच्या 'क्रिकेट लाइव्ह' कार्यक्रमात बोलताना भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अहमदाबादमधल्या या नव्या स्टेडियमबाबत बोलताना एक अजब दावा केला आहे. 

शेतकऱ्याचं मुलीचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न!, वडिलांनी थेट शेताचं रुपांतर मैदानात केलं

"देशात क्रिकेटचे सर्वाधिक चाहते हे गुजरातमध्ये आहेत", असं वक्तव्य सुनील गावस्कर यांनी केलंय. गुजरातच्या अहमदनगरमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर आज पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. या सामन्याला जवळपास ५० हजार प्रेक्षक उभे आहेत. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत या स्टेडियमचं औपचारिक उदघाटन करण्यात आलं. यावेळी या स्टेडियमचं नामांतर नरेंद्र मोदी स्टेडियम असं करण्यात आलं आहे. 

गावस्कर नेमकं काय म्हणाले?पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतरच्या कार्यक्रमात बोलत असताना समालोचक सुनील गावस्कर यांनी गुजरातमधील क्रिकेट चाहत्यांबाबत वक्तव्य केलं. "देशात क्रिकेटचे सर्वाधिक चाहते हे गुजरातमध्ये आहेत. पश्चिम बंगालमध्येही आहेत. पण तिथं फुटबॉलचेही चाहते आहेत. मुंबईतही आहेत. पण तिथंही विविध खेळ आहेत. पंजाब आणि उत्तरेकडील राज्यात हॉकीवरचं प्रेम आपल्याला दिसतं. पण गुजरातमध्ये क्रिकेटशिवाय दुसरं काहीच नाही. त्यामुळे इथल्या लोकांसाठी क्रिकेटच सारंकाही आहे. त्याचा अनुभव आज मैदानातही येतोय", असं सुनील गावस्कर म्हणाले.  

टॅग्स :सुनील गावसकरनरेंद्र मोदी स्टेडियमभारत विरुद्ध इंग्लंडबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ