Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru Live IPL 2025: आज (2 एप्रिल) IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सामना होत आहे. सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. RCB या हंगामातील पहिला सामना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळत आहे. RCB ने GT पुढे 170 धावांचे लक्ष्य दिले आहे.
आरसीबीची निराशाजनक फलंदाजी
प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीची सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्याच षटकात विराट कोहलीच्या रुपाने आरसीबीला पहिला धक्का बसला. अवघ्या 7 धावा करून कोहली अर्शद खानचा बळी ठरला. यानंतर तिसऱ्याच षटकात देवदत्त पडिकलला सिराजने बोल्ड केले. त्यानंतर सिराजनेच पाचव्या षटकात स्फोटक फिल सॉल्टला माघारी धाडले. तर, इशांतने सातव्या षटकात कर्णधार रजत पाटीदारचि विकेट घेतली.
जितेश-लिव्हिंगस्टनने डाव सांभाळला
बंगळुरुचा संघ अवघ्या 42 धावांवर 4 विकेट गमावून अडचणीत सापडला होता. यानंतर जितेश शर्मा आणि लियाम लिव्हिंगस्टन यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली आहे. या दोघांमध्ये मोठी भागीदारी झाल्यामुळे संघाने शंभरचा आकडा पार केला. लियाम लिव्हिंग्स्टनने एकाच षटकात 3 षटकार मारत राशिद खानचा धुव्वा उडवला अन् 40 चेंडूत 54 धावांची दमतार खेळी केली.
टीम डेव्हिडने मारला शेवटचा पंच...
एक एक करत आरसीबीच्या विकेट पडत होत्या, संघ 150 चा आकडा पार करेल की नाही, अशी शंका होती. पण, लिव्हिंगस्टन आणि जितेश यांनी संघाला सावरले. या दोघांशिवाय नवव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आलेल्या टिम डेव्हडिने 18 चेंडूत 32 धावा काढत संघाला 169 धावांवर नेऊन ठेवले. दरम्यान, गुजरात टायटन्सकडून मोहम्मद सिराजने 3, साई किशोरने 2 तर राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा आणि इशांत शर्माने प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.
गुजरात टायटन (प्लेइंग इलेव्हन): साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (सी), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (प.), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, यश दयाल.
Web Title: GT vs RCB Live IPL 2025: Virat Kohli's flop show; Livingston-Jitesh-tim saved RCB, GT got a target of 170 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.