Join us  

ब्रिस्बेनमधील 44,000 निराधार लोकांच्या मदतीला टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाची धाव

लॉकडाऊनमुळे अनेकांना बेघरही व्हावे लागले आणि त्यांच्या मदतीसाठी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक पुढे आले आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 1:22 PM

Open in App

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 63 लाख 70,762 वर पोहोचली आहे. त्यापैकी 29 लाख 04,690 रुग्ण बरे झाले असले तरी 3 लाख 77,515 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 98, 706 वर पोहोचली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही चिंतेची बाब आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी 95,754 रुग्ण बरे झाले आहेत, तर 5608 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेता जगभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची टांगती तलवार आली. लॉकडाऊनमुळे अनेकांना बेघरही व्हावे लागले आणि त्यांच्या मदतीसाठी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल पुढे आले आहेत.

मॉडल, अभिनेत्री, IPL चीअरगर्ल... मोहम्मद शमीच्या पत्नीबाबत जाणून घ्या सर्वकाही!

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज ग्रेग चॅपल हे नेहमी वादात अडकले आहेत. त्यांची कारकिर्द वादग्रस्त राहिली आहे. पण, सध्या चॅपल चांगल्या कामामुळे चर्चेत आले आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात चॅपल यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. 73 वर्षीय चॅपल यांनी ब्रिस्बेन येथील निराधार लोकांसाठी ब्रेकफास्ट चॅरीटी सुरू केली आहे. चॅपल फाऊंडेशन आणि 300 व्हॉलेंटियर यांनी हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमातून ते 44000 निराधार लोकांना सकाळचा नास्ता देणार आहेत. दोन ट्रक भरून हा नास्ता लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे.

चॅपेल म्हणाले,''भूक काही हंगामी नसते. आम्ही वर्षभर लोकांना ब्रेकफास्ट पुरवत आहोत.'' फाऊंडेशनला मिळणारा प्रत्येक पैसा निराधार लोकांसाठी वापरला जातो. या फाऊंडेशनमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी राष्ट्रपती जॉन हॉवर्ड यांच्यासह  माजी क्रिकेटपटू डेनीस लिली आणि टेनिसपटू पॅट रॅफ्टर हेही आहेत. ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 7000 कोरोना रुग्ण आढळले असून 103 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोण होता George Floyd? ज्याच्या मृत्यूमुळे अमेरिकेत सुरू झालं हिंसक आंदोलन! 

लॉकडाऊनमध्ये मजूरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरला मोहम्मद शमी; Video Viral 

"युवराज सिंग माफी माग", सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मागणी

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याआॅस्ट्रेलिया