Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोड बातमी! हिटमॅन रोहित बनला 'बाप'माणूस, शर्मा कुटुंबीयांना 'कन्यारत्न'  

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लर्क याच्यासोबत एका मुलाखतीमध्ये रोहितने याबाबत माहिती दिली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 09:33 IST

Open in App

मुंबई - टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे ही आनंदवार्ता कळाली तेव्हा रोहित मिशन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र, या आनंदी वार्तामुळे रोहित आणि त्याच्या कुटुंबात आनंदाची लहर पसरली आहे. तर, ही गोड बातमी समजताच चाहत्यांकडूनही रोहित आणि रितिका यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

'हिटमॅन' रोहित शर्मा आतुरतेनं पाहतोय या 'Life Changing Moment'ची वाट !

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याच्यासोबत एका मुलाखतीमध्ये रोहितने याबाबत माहिती दिली होती. लवकरच, मी बाप  होणार असल्याचं रोहितनं स्पष्ट केलं होतं. रोहितच्या या गुडन्यूजमुळे टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला होता. अखेर, रोहितच्या घरी आज ही गुडन्यूज आली. त्यानुसार, रोहितची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दरम्यान, सध्या रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र, आपल्या लाडक्या लेकीला पाहण्यासाठी तो लवकरच भारत दौरा करू शकतो. भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, ज्या दोन्ही सामन्यात रोहित खेळला, ते दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले असून ज्या सामन्यात रोहितला विश्रांती दिली होती, त्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

हिटमॅन रोहित शर्माच्या घरातून आलेल्या या गोडी बातमीमुळे रोहितच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. तर, चाहत्यांकडून नववर्षांचे स्वागत डबल धमाक्यात होणार असल्याचे दिसते.   

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ