Join us

MCA ची चाहत्यांना खुशखबर! वानखेडेमध्ये मोफत एन्ट्री; 'चॅम्पियन' संघाला पाहण्याची सुवर्णसंधी

गुरुवारी सकाळी टीम इंडिया राजधानी दिल्लीत पोहोचली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 13:18 IST

Open in App

भारतीय संघाने बार्बाडोसच्या धरतीवर विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. गुरुवारी सकाळी टीम इंडिया राजधानी दिल्लीत पोहोचली. आज संध्याकाळी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर येईल. इथे खेळाडूंच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडेल. याशिवाय सायंकाळी ५ वाजल्यापासून मरीन ड्राईव्हवर विजय यात्रा आणि वानखेडेवर महोत्सव साजरा केला जाणार आहे. विश्वचषक घरी येतोय, अशी पोस्ट मुंबईकर रोहितने एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे. 

दरम्यान, आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने चाहत्यांना खुशखबर दिली. खरे तर वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांना मोफत एन्ट्री मिळणार आहे. गेट नंबर २, ३ आणि ४ मधून दुपारी चार वाजल्यापासून चाहत्यांना वानखेडेमध्ये प्रवेश मिळेल. 

टीम इंडियाची आज सायंकाळी मुंबईत विजयी परेड होणार आहे. याआधी भारतीय संघाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारतीय क्रिकेट संघाने ७, लोककल्याण मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. २९ जून रोजी बार्बाडोस येथे ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचली.

दरम्यान, विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने सात धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यासह तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. २०१३ नंतर भारताने प्रथमच आयसीसीचा किताब जिंकला आहे. भारताला वन डे विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, यावेळी रोहितसेनेने ट्रॉफीवर कब्जा केला. दरम्यान, २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला. 

टॅग्स :मुंबईभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयसोशल व्हायरल