Glenn Philips Running: क्रिकेटचा सामना की धावण्याची शर्यत.... ग्लेन फिलिप्सच्या अजब गजब रनिंगची सर्वत्र चर्चा (Video Viral)

न्यूझीलंडचा श्रीलंकेवर ६५ धावांनी विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 05:42 PM2022-10-29T17:42:51+5:302022-10-29T17:44:31+5:30

whatsapp join usJoin us
Glenn Phillips showing sprint technique as running race runner in nz vs sl T20 world cup 2022 | Glenn Philips Running: क्रिकेटचा सामना की धावण्याची शर्यत.... ग्लेन फिलिप्सच्या अजब गजब रनिंगची सर्वत्र चर्चा (Video Viral)

Glenn Philips Running: क्रिकेटचा सामना की धावण्याची शर्यत.... ग्लेन फिलिप्सच्या अजब गजब रनिंगची सर्वत्र चर्चा (Video Viral)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Glenn Philips Running Viral Video: न्यूझीलंडचा स्टार फलंदाज ग्लेन फिलिप्स याने शनिवारी रंगलेल्या T20 विश्वचषक 2022 च्या सुपर-12 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले. फिलिप्सने आपल्या संघाला अत्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. टी२० विश्वचषकाच्या यंदाच्या हंगामात शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाजही ठरला. याआधी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रॅली रूसो याने शतक झळकावले आहे. ग्लेन फिलिप्सच्या ६४ चेंडूत १०४ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने १६७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १०२ धावांतच आटोपला. न्यूझीलंडने मोठा विजय मिळवलाच, पण त्यापेक्षा जास्त चर्चा रंगली ती ग्लेन फिलिप्सच्या धावण्याच्या पद्धतीची...

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील फिलिप्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फिलिप्स नॉन-स्ट्राइक वर एखाद्या धावपटूसारखा (Racer) दिसत आहेत. ग्लेन फिलिप्स नॉन-स्ट्राइकवर उभा होता आणि त्याला झटपट एक धाव काढायाची होती आणि स्ट्राइकवर परत जायचे होते. अशा वेळी त्याने धावण्यासाठी वेग मिळावा म्हणून स्टान्स घेतला आणि गोलंदाजाने चेंडू टाकताच तो वेगाने धावला आणि रन पूर्ण केली.

'क्रिकेट स्प्रिंट' आणि Spirit of Cricketचे केले जात आहे कौतुक

मिचेल सँटनर फलंदाजी करत होता. सँटनरने हलकेच चेंडू खेळला आणि ग्लेन फिलिप्सला स्ट्राइक दिली. त्यानंतर त्याने आपले शतक पूर्ण केले. फिलिप्सच्या या 'क्रिकेट स्प्रिंट'चे क्रिकेट चाहते कौतुक करत आहेत. त्याच्या दमदार खेळीमुळेच न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध  अप्रतिम असा विजय मिळवला. यात आणखी एक बाब म्हणजे, गोलंदाजाने चेंडू टाकण्याच्या आधी तो क्रीजमधून बाहेर निघाला नाही. उलट त्याने वेगाने धावण्याचा पर्याय शोधून काढला. त्यामुळे Spirit of Cricket बद्दलही त्याचे कौतुक करण्यात आले.

न्यूझीलंडची सुरूवात खराब, पण फिलिप्सने सांभाळलं!

न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फिन ऍलन आणि डेव्हॉन कॉनवे प्रत्येकी एकच धाव घेत पॅव्हेलियनमध्ये परतले. कर्णधार केन विल्यमसनलाही बाद केल्यानंतर परिस्थिती बिकट झाली. यानंतर फिलिप्स आणि मिशेलने डावाची धुरा सांभाळत अर्धशतकी भागीदारी केली. न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद १६७ धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी १६८ धावांचे लक्ष्य ठेवले.

श्रीलंकेचा डाव सुरूवातीपासूनच गडगडला!

श्रीलंकेच्या संघाचे फलंदाज न्यूझीलंड समोर पूर्णपणे नापास झाले. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी या दोघांच्या भेदक माऱ्यामुळे श्रीलंकेची अवस्था ५ बाद २४ अशी होती. त्यानंतर भानुका राजपक्षे (३४) आणि दसुन शनाका (३५) यांनी झुंज दिल्यामुळे श्रीलंकेला शंभरी गाठता आली. पण अखेर १९.२ षटकांत १०२ धावांवर त्यांचा डाव आटोपला.

Web Title: Glenn Phillips showing sprint technique as running race runner in nz vs sl T20 world cup 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.