महिला प्रीमिअर लीग २०२५ च्या तिसऱ्या हंगामातील सलामीच्या लढतीत गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु महिला संघाने आपली ताकद दाखवून दिली. रिच्याच्या स्फोटक फटकबाजीच्या जोरावर 'नॉट रिचेबल' वाटणारी २०० पारची लढाई जिंकून आरसीबीच्या संघानं वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये नवा इतिहास रचला आहे. गुजरातच्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा २०० धावांचा टप्पा पार केला. याआधी २०२३ च्या हंगामात चार वेळा २०० पार टार्गेट सेट झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण आरसीबी २०० पारची लढाई जिंकणारी पहिली टीम ठरली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ॲशली गार्डनरची नाबात ८९ धावांची खेळी, गुजरातनं सेट केलं होतं २०२ धावांचे टार्गेट
वुमन्स प्रीमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामातील सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कर्णधार स्मृती मानधनानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला होता. तिचा हा निर्णय सुरुवातीला खराही ठरला. गुजरातने संघाच्या धावफलकावर अर्धशतक लागण्यापूर्वी पॅव्हेलियनचा रस्ता धरला. पण बेथ मूनी (Beth Mooney) आणि ॲशली गार्डनर (Ashleigh Gardner) या दोघींच्या अर्धशतकी खेळीमुळे गुजरात जाएंट्स संघाने आरसीबीसमोर तगडे आव्हान सेट केले. बेथ मूनीची ४२ चेंडूतील ५६ धावांची खेळी आणि त्यायनंतर गार्डनर हिने ३७ चेंडूत नाबाद ७९ धावा करत संघाच्या धावफलकावर २०१ धावा लावल्या. डिआंड्रा डॉटिन
हिने १३ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. गुजरातच्या संघानं सलामीच्या लढतीत गत चॅम्पियन आरसीबीसमोर २०२ धावांचे टार्गेट सेट केले होते.
आधी पेरीनं सावरलं
वुमन्स प्रीमिय लीगच्या आतापर्यंतच्या इतिहासात पाचव्यांदा २०० पेक्षा अधिक धावा झाल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत २०० पारची लढाई कुणीच जिंकली नव्हती. त्यामुळे सहाव्यांदा दोनशे धावा करण्याचं मोठं चॅलेंज आरसीबीसमोर होते. सर्वांच्या नजरा स्मृती मानधनावर खिळल्या असताना ती ७ चेंडूत ९ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतली. डॅनिएल ही देखील ४ धावा करून माघारी फिरली. त्यामुळे २०० पारची लढाई आणखी चॅलेंजिग झाली. पण एलिसा पेरीनं ३४ चेंडूत केलेल्या ५७ धावांसह संघ पहिल्या धक्क्यातून सावरला.
मग रिचा अन् कनिकानं लावला जोर, अन् आरसीबीनं रचला इतिहास
राघवी बिस्टनं उपयुक्त अशा २५ धावांचे योगदान दिले. त्यानंतर रिचा घोष आणि कनिका यांनी सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. रिचानं २७ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ६४ धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूला कनिका अहुजानं १३ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने नाबाद ३० धावां करत अशक्य वाटणारे लक्ष्य १९ व्या षटकातच पार केले. WPL मध्ये सहाव्यांदा २०० धावा करण्यासह आरबीनं २०० पारची लढाई जिंकून इतिहास रचला. जे याआधी कुणाला जमलं नव्हतं ते त्यांनी करून दाखवलं.
Web Title: GG vs RCB WPL 2025 Richa Ghosh And Kanika Royal Challengers Bengaluru Women To Historic Six Wicket Win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.