ICC Cricket World Cup League Two 2023-27 Scotland vs Netherlands : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप पात्रता फेरीतील स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामन्यात षटकार चौकारांची बरसात झाल्याचे पाहायला मिळाले. स्कॉटलंडमधी डंडी येथील फोर्टहिलच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना स्कॉटलंडच्या संघाने ३६९ धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यात स्कॉटिश सलामीवीर जॉर्ज मुन्से याने १९१ धावांची धमाकेदार खेळी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१४ चौकार अन् ११ षटकार! पण द्विशतक हुकलं अन्...
स्कॉटलंडचा सलामीवीर जॉर्ज मुन्से याने १४ चौकार आणि ११ षटकाराच्या मदतीने या सामन्यात १५० चेंडूत १९१ धावा कुटल्या. द्विशतक साजरे करण्याची सुवर्ण संधी त्याच्याकडे होती. पण १० चेंडू शिल्लक असताना तो फसला. द्विशतक तर हुकलंच अन् डांवाचा डोंगर उभारून देखील संघाच्या पदरी पराभव आला.
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
१५ वर्षांचा विक्रम मोडला
वनडे सामन्यात जॉर्ज मुन्सेचं द्विशतक अवघ्या ९ धावांनी हुकले. या खेळीसह मुन्सेनं खास विक्रम आपल्या नावे केला आहे. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधील असोसिएट संघाकडून (आयसीसी पूर्णवेळ सदस्य नसणारा संघ) सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झाला आहे. त्याने १५ वर्षांपासून अबाधित असलेला पॉल स्टर्लिंगचा रेकॉर्ड मोडीत काढलाय. आयरिश फलंदाजाने २०१० मध्ये कॅनडा विरुद्ध १७७ धावांची खेळी केली होती. आता स्कॉटलंडच्या मुन्सेनं १९१ धावांसह या यादीत टॉपला पोहचला आहे,
नेदरलंडचा कडक रिप्लाय, टीम इंडियााच विक्रमही टाकला मागे
स्कॉटलंडच्या ताफ्यातून जॉर्ज मुन्सेनं केलेल्या १९१ धावांच्या खेळीला कडक रिप्लाय देताना नेदरलंडकडून मॅक्स ओ'दाउद (Max ODowd) याने १५८ धावांची नाबाद खेळी केली. १३० चेंडूतील या खेळी त्याने १२ चौकार आणि ४ षटकार मारले. या खेळीमुळे जॉर्ज मुन्सेची विक्रमी खेळी व्यर्थ ठरली अन् नेदरलंडच्या संघाने पहिल्यांदाच ३०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवला. विशेष म्हणजे या संघाने भारताचा रेकॉर्डही मागे टाकलाय. भारतीय संघाने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियासमोर ३६० धावांचा यशस्वी पाठलाग केल्याचा रेकॉर्ड आहे. नेदरलंडनं ३७० धावांचा यशस्वी पाठलाग करत टीम इंडियाला मागे टाकल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: George Munsey Break Paul Stirling Record Highest Innings As Associate Batter In ODI Cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.