Join us

गिब्जच्या चेष्टेखोर ट्विटमुळे अश्विन भडकला, दिले असे प्रत्युत्तर

दक्षिण आफ्रिकेचा एकेकाळचा धडाकेबाज फलंदाज हर्षेल गिब्ज आणि भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्यात आज ट्विटरवर चांगलेच वाकयुद्ध रंगले. अश्विनने ट्विटरवर केलेल्या एका ट्विटची गिब्जने खिल्ली उडवली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 19:26 IST

Open in App

नवी दिल्ली -  दक्षिण आफ्रिकेचा एकेकाळचा धडाकेबाज फलंदाज हर्षेल गिब्ज आणि भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्यात आज ट्विटरवर चांगलेच वाकयुद्ध रंगले. अश्विनने ट्विटरवर केलेल्या एका ट्विटची गिब्जने खिल्ली उडवली. ही बाब जिव्हारी लागलेल्या अश्विनने गिब्जला जोरदार प्रत्युत्तर देताना मॅच फिक्सिंग प्रकरणाची आठवण करून दिली. त्याचे झाले असे की, अश्विनने आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नायकीच्या चपलांचे प्रमोशन केले. त्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये अश्विनने नायकीच्या या चपलांची वैशिष्टे सांगितली होती. ही पोस्ट पाहून गिब्जला अश्विनची फिरकी घेण्याची लहर आली. "अश्निन आता हे शूज वापरल्यावर तू आधीपेक्षा अधिक वेगाने धावू शकशील, असा टोमणा त्याने ट्विटरवरून मारला." त्यासोबत एक स्मायलीही पोस्ट केली. मात्र गिब्जने केलेली ही मस्करी अश्विनने चांगलीच गांभीर्याने घेतली. त्याने गिब्जच्या ट्विटला त्वरित उत्तर दिले. मित्रा मी तुझ्याएवढा वेगाने धावू शकत नाही, दुर्दैवाने मी तुझ्याएवढा सुखीही नाही. पण सुदैवाने मला नैतिक ज्ञान मात्र मिळाले आहे. ज्या खेळाने तुमच्या उदरनिर्वाहाची सोय केली आहे, तो फिक्स करणे योग्य नाही एवढे मी नक्कीच शिकलो आहे. 

अश्विनच्या या रोखठोक उत्तराने गिब्ज हडबडला. कदाचित तुला गंमत कळत नसावी. हा विषय इथेच संपवुया, अशी सारवासारव गिब्जने केली. मग अश्विननेही त्याला प्रत्युत्तर दिले. मीसुद्धा थट्टेतूनच रिप्लाय केला. पण बघ नेटीझन्सनी आणि तूसुद्धा माझा विनोन गांभीर्याने घेतला. मित्रा थट्टामस्करीसाठी मीसुद्धा तयार आहे. आपण कधीतरी जेवणाला बसल्यावर या मुद्द्यावर चर्चा करूया. 

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ