Join us

Oxygen भगाया 'AAP' ने, गौतम गंभीरने दिल्ली सरकारला फटकारले 

राजधानी दिल्ली सध्या प्रदूषणामुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 10:26 IST

Open in App

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली सध्या प्रदूषणामुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत. भारतीय संघाचा क्रिकेटपटू गौतम गंभीरने या समस्येकडे लक्ष वेधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले. तो म्हणाला,''केजरीवाल यांनी खोटी आश्वासनं दिली. ते प्रदूषण व डेंग्युची समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. केजरीवाल यांच्यामुळे या पिढीला प्रदूषणात रहावे लागत आहे.'' 

गंभीरने दिल्ली सरकारवर निशाणा साधताना बुधवारी एक ट्विट केले. ''दर्दे दिल, दर्दे जिगर दिल्ली में जगाया AAP ने, पहले तो यहां Oxygen था, Oxygen भगाया AAP ने.,''हे ट्विट गंभीरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी यांना टॅग केले. या पोस्टसह त्याने प्रदूषणाचा एक फोटोही टाकला आहे. 

टॅग्स :गौतम गंभीरआप