Join us

महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसालाच गौतम गंभीरनं बदलला फेसबूकचा कव्हर फोटो; माहिचे चाहते भडकले

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( Former India captain MS Dhoni) आज ४० वर्षांचा झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 17:42 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( Former India captain MS Dhoni) आज ४० वर्षांचा झाला. सोशल मीडियावर कॅप्टन कूल धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा चाहत्यांनी पाऊस पाडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीला शुभेच्छा देताना चाहते इमोशनल झालेले पाहायला मिळत आहेत. बीसीसीआय आणि आयसीसी यांनीही धोनीचा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. पण, अशात चर्चा सुरू झालीय ती माजी सलामीवीर गौतम गंभीर याच्या फेसबूक कव्हर फोटोची... गौतम गंभीरनं त्याचं फेसबूक कव्हर फोटो बदलला आहे आणि आता त्यानं २०११च्या वर्ल्ड कप फायनलमधील त्याचा फोटो ठेवला आहे. त्या सामन्यात गंभीरनं ९७ आणि धोनीनं नाबाद ९१ धावा केल्या होत्या.

गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातला वाद काही लपलेला नाही. गंभीर सातत्यानं धोनीवर टीका करत आला आहे. २०११चा वर्ल्ड कप हा धोनीनं विजयी षटकार मारून जिंकून दिला असा दावा होत असताना गंभीरनं हा एका व्यक्तीमुळे नव्हे तर सांघिक कामगिरीमुळे मिळालेला विजय असल्याचे अनेकदा म्हटले आहे. त्यावरून धोनीच्या फॅन्सकडून टीकाही झाली. त्यात आजच गंभीरनं कव्हर फोटो बदलल्यानं धोनीचे चाहते पुन्हा खवळले आहेत.  

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीगौतम गंभीर