मुंबई - बीसीसीआयने भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यासाठी Yo-Yo टेस्ट पास करणे हे अनिवार्य केले आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंना हा अडथळा पार करण्यात अपयश आल्याने संघात स्थान मिळालेले नाही. संघनिवडीसाठी अनिवार्य केलेल्या या टेस्टवर अनेकांनी टीका केल्या. मात्र, तरीही भारताच्या संघ व्यवस्थापक आपल्या मतावर ठाम राहिले आणि सर्व खेळाडू ही टेस्ट देतील याची काळजी त्यांनी घेतली.
भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने Yo-Yo टेस्टवर गंमत करताना त्याची मोठी मुलगी आझीनचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. त्यात त्याने मुलगीने Yo-Yo टेस्ट दिली आणि ती पास झाल्याचा दावा केला आहे.
खेळाडूंची तंदुरूस्ती आणि गती यांची चाचणी घेण्यासाठी हा yo-yo टेस्टचा निर्णय घेतला गेला. अंबाती रायडूला या टेस्टमध्ये अपयश आल्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरूद्धच्या वन डे मालिकेतून वगळण्यात आले होते. मोहम्मद शमीलाही ही टेस्ट पास करता आली नव्हती. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन आणि सचिन तेंडुलकर यांनी या टेस्टवर टीका केली आहे.