Join us

निवृत्तीनंतर गंभीर काय करणार, ट्विटरवर मिळाले संकेत

गंभीरने काही दिवसांपूर्वी मला समालोचक होण्यापेक्षा प्रशिक्षक व्हायला आवडेल, असे म्हटले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 13:49 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर गंभीर नेमका काय करणार, याची उत्सुकता साऱ्यांना आहे. गंभीरने काही दिवसांपूर्वी मला समालोचक होण्यापेक्षा प्रशिक्षक व्हायला आवडेल, असे म्हटले होते. प्रशिक्षकपदाची एक ऑफरही त्याला मिळू शकते. याबाबत ट्विटरवर नेमके संकेत काय मिळाले, ते पाहा...

यापूर्वी गंभीरने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केले होते. गंभीरने आपल्या कप्तानीखाली कोलकात्याला दोनवेळा जेतेपद जिंकवून दिले होते. त्यानंतर गंभीरने दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपदही स्वीकारले होते.

 

टॅग्स :गौतम गंभीर