Gautam Gambhir KL Rahul Viral Photo: गौतम गंभीरचा पराभवानंतर राहुलला 'खतरनाक लूक'; फोटोवरून मीम्स व्हायरल

लखनौचा RCB ने १४ धावांनी केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 12:32 IST2022-05-26T12:31:13+5:302022-05-26T12:32:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Gautam Gambhir stares at KL Rahul Dangerous Look after RCB defeat LSG in IPL 2022 Playoffs Pic Viral Comedy Memes | Gautam Gambhir KL Rahul Viral Photo: गौतम गंभीरचा पराभवानंतर राहुलला 'खतरनाक लूक'; फोटोवरून मीम्स व्हायरल

Gautam Gambhir KL Rahul Viral Photo: गौतम गंभीरचा पराभवानंतर राहुलला 'खतरनाक लूक'; फोटोवरून मीम्स व्हायरल

Gautam Gambhir KL Rahul Viral Photo: आपल्या पहिल्याच हंगामात थेट प्ले ऑफ्समध्ये धडक मारणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स संघाचा प्रवास एलिमिनेटर सामन्यात संपुष्टात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने बुधवारच्या सामन्यात लखनौला १४ धावांनी पराभूत केले. साखळी फेरीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला लखनौचा संघ २००हून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या लयीत होता. मात्र शेवटच्या तीन षटकांत सामना पूर्णपणे पलटला. लोकेश राहुल आणि दीपक हुड्डा दोघेही बाद झाले आणि लखनौने सामना गमावला. या सामन्यानंतर लखनौ संघाचा मेंटॉर गौतम गंभीर याला हा पराभव फारसा रूचला नाही. सामना हरल्यानंतर गंभीरने कर्णधार लोकेश राहुलला खतरनाक लूक दिला.

गौतम गंभीरने लूक दिल्याचा फोटो चांगलाच व्हायरल झाला. शेवटच्या चार षटकांत लखनौच्या फलंदाजीची झालेली पडझड गौतम गंभीरला रूचली नसल्याचं त्याच्या नजरेतून स्पष्ट दिसलं. त्यामुळे त्याने शब्दांऐवजी नजरेतून लखनौ संघाच्या कामगिरीवर नाराजी दर्शवली. त्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. इतकंच नव्हे तर त्या फोटोवरून भन्नाट मीम्सही सोशल मीडियावर दिसून आले.

----

दरम्यान, लखनौ विरूद्धच्या सामन्यात बंगलोरने प्रथम फलंदाजी करताना २०७ धावा केल्या. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस यांसारख्या बड्या खेळाडूंनी साफ निराशा केल्यानंतर युवा फलंदाज रजत पाटीदारने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने शतक ठोकत संघाला द्विशतकी मजल मारून दिला. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना लखनौचा क्विंटन डी कॉक स्वस्तात परतला. लोकेश राहुलने अर्धशतक ठोकलं. त्याला दीपक हुड्डाने दमदार फटकेबाजी करत चांगली साथ दिली. पण अखेरीस त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. 

Web Title: Gautam Gambhir stares at KL Rahul Dangerous Look after RCB defeat LSG in IPL 2022 Playoffs Pic Viral Comedy Memes