Join us

गौतम गंभीर आता दिल्ली क्रिकेट संघटनेमध्ये निरीक्षक

भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीर आता नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. पण त्याची ही इनिंग क्रिकेटच्या मैदानात होणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 22:08 IST

Open in App
ठळक मुद्देवरिष्ठ पत्रकार रजत शर्मा यांची दिल्ली संघटनेवर अध्यक्ष म्हणून आज निवड करण्यात आली. त्यांच्या कामकाजावर नजर ठेवण्यासाठी गंभीरची निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीर आता नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. पण त्याची ही इनिंग क्रिकेटच्या मैदानात होणार नाही, तर आता तो दिल्ली क्रिकेट संघटनेमध्ये निरीक्षकाची भूमिका पार पाडणार आहे.  वरिष्ठ पत्रकार रजत शर्मा यांची दिल्ली संघटनेवर अध्यक्ष म्हणून आज निवड करण्यात आली. त्यांच्या कामकाजावर नजर ठेवण्यासाठी गंभीरची निवड करण्यात आली आहे.

रजत शर्मा यांच्या कार्यकारीणीमध्ये कुणाची वर्णीदिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी विनोद तिहारा, तर खजिनदार म्हणून ओमप्रकाश शर्मा यांची निवड झाली आहे. राजन मचंदा सहसचिव, रेनू खन्ना महिला संचालक म्हणून निवड झाली आहे. तसेच कार्यकारिणीत अपूर्व जैन, अलोक मित्तल, नितीन गुप्ता, शिवनंदन शर्मा, सीए सुधीरकुमार अग्रवाल यांची निवड झाली आहे.

टॅग्स :गौतम गंभीरक्रिकेट