Gautam Gambhir : आपापल्या क्षेत्रातील राजे...! गौतम गंभीरची KKRमध्ये घरवापसी? कर्णधाराने घेतली फिरकी

माजी भारतीय खेळाडू अन् विद्यमान भाजपा खासदार गौतम गंभीरने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 15:52 IST2023-09-21T15:52:01+5:302023-09-21T15:52:46+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Gautam Gambhir met Shah Rukh Khan Nitish Rana commented that this is a sign of a homecoming for Kolkata Knight Riders  | Gautam Gambhir : आपापल्या क्षेत्रातील राजे...! गौतम गंभीरची KKRमध्ये घरवापसी? कर्णधाराने घेतली फिरकी

Gautam Gambhir : आपापल्या क्षेत्रातील राजे...! गौतम गंभीरची KKRमध्ये घरवापसी? कर्णधाराने घेतली फिरकी

Gautam Gambhir met Shah Rukh Khan : माजी भारतीय खेळाडू अन् विद्यमान भाजपा खासदार गौतम गंभीरने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. आपल्या सडेतोड वक्तव्याने नेहमी चर्चेत असलेला गौतम गंभीर पुन्हा एकदा चर्चेत आला. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गौतम गंभीर समालोचन करतो आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा तो मार्गदर्शक आहे. गंभीरने शाहरूखसोबत फोटो शेअर करताच कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने भन्नाट प्रतिक्रिया दिली.

गंभीरच्या पोस्टवर व्यक्त होताना नितीश राणाने म्हटले, "आपापल्या क्षेत्रातील राजे..., हे घरवापसीचे लक्षण असू शकते का? फक्त आश्चर्यचकित होत आहे." एकूणच गौतम गंभीरची कोलकाता नाईट रायडर्समध्ये घरवापसी होणार का? असा प्रश्न नितीश राणाने उपस्थित केला आहे.

भाजपाचा खासदार असलेल्या गौतम गंभीरने ट्विट केले की,'शाहरुख केवळ बॉलिवूडचा राजा नाही तर हृदयाचा राजा आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण भेटतो तेव्हा मी अमर्याद प्रेम आणि आदराने परत जातो. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.

गौतम गंभीरचा भारताच्या २००७ च्या ट्वेंटी-२० आणि २०११च्या वन डे विश्वचषकाच्या स्पर्धेच्या विजयात खूप मोठा वाटा आहे. त्याने ५८ कसोटी सामन्यांत ४२च्या सरासरीने ४१५४ धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये १४७ सामन्यांत ५२३८ धावा आणि ३७ ट्वेंटी-२०त ९३२ धावा त्याच्या नावावर आहेत. त्याने एकूण २० आंतरराष्ट्रीय शतकांसह ६४ अर्धशतकं झळकावली आहेत. आयपीएलमध्येही त्याने कोलकाता नाइट रायडर्सला दोन जेतेपदं मिळवून दिली आहेत. त्याने आयपीएलमध्ये १५४ सामन्यांत ४२१६ धावा केल्या आहेत. 

Web Title: Gautam Gambhir met Shah Rukh Khan Nitish Rana commented that this is a sign of a homecoming for Kolkata Knight Riders