Gautam Gambhir met Shah Rukh Khan - भारतीय संघाचा माजी सलामीवर गौतम गंभीर याने बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. सडेतोड वक्तव्याने नेहमी चर्चेत असलेल्या गौतमच्या या भेटीला नेटिझन्सनी डोक्यावर घेतले. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गौमत गंभीर समालोचन करतो आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील लखनौ सुपर जायंट्सचा तो मार्गदर्शक आहे. शाहरूखचा नुकताच प्रदर्शित झालेला 'जवान' हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला आहे. ७००+ कोटींच्या घरात या चित्रपटाने आतापर्यंत कमाई केली आहे. गौतम आणि शाहरुखची भेट दोघांच्या चाहत्यांना आनंदित करणारी ठरतेय.
भाजपाचा खासदार असलेल्या गौतम गंभीरने ट्विट केले की,''शाहरुख केवळ बॉलिवूडचा राजा नाही तर हृदयाचा राजा आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण भेटतो तेव्हा मी अमर्याद प्रेम आणि आदराने परत जातो. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.''
भारताच्या २००७ च्या ट्वेंटी-२० आणि २०११च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या विजयात गंभीरचा खूप मोठा वाटा आहे. त्याने ५८ कसोटी सामन्यांत ४२च्या सरासरीने ४१५४ धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये १४७ सामन्यांत ५२३८ धावा आणि ३७ ट्वेंटी-२०त ९३२ धावा त्याच्या नावावर आहेत. त्याने एकूण २० आंतरराष्ट्रीय शतकांसह ६४ अर्धशतकं झळकावली आहेत. आयपीएलमध्येही त्याने कोलकाता नाइट रायडर्सला दोन जेतेपदं मिळवून दिली आहेत. त्याने आयपीएलमध्ये १५४ सामन्यांत ४२१६ धावा केल्या आहेत.