Join us

गौतम गंभीरकडून शाहिद आफ्रिदीला 'गिफ्ट'; काश्मीर मुद्यावर म्हणाला...

 जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 कलम काढून टाकल्यानंतर पाकिस्तानातून सातत्यानं टीका होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 09:06 IST

Open in App

नवी दिल्ली :  जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 कलम काढून टाकल्यानंतर पाकिस्तानातून सातत्यानं टीका होत आहे. आता तर पाकिस्तानाकडून युद्धाची भाषा बोलली जात आहे. पाकिस्तानी राजकारणींसोबत क्रिकेटपटूही जम्मू-काश्मीर मुद्यावरून भारतावर टीका करत आहेत आणि यात शाहिद आफ्रिदी आघाडीवर आहे. आफ्रिदीनं पुन्हा एकदा काश्मीर मुद्यावरून सोशल मीडियावर ट्विट केले आणि भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरनं नेहमीप्रमाणे त्याला सडेतोड उत्तर दिले. पण, यावेळी गंभीरनं उत्तरासोबत आफ्रिदीसाठी एक 'गिफ्ट'ही ऑर्डर केले आहे. काय आहे ते गिफ्ट?

आफ्रिदीनं ट्विट केलं की,''काश्मीरी जनतेच्या समर्थनात पंतप्रधान इम्रान खान यांनी सुरु केलेल्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी पाठींबा द्या. शुक्रवारी दुपारी 12 वाजता मी मजार ए काएद येथे उपस्थित राहीन. काश्मीरी भावंडाच्या समर्थनासाठी माझ्या सोबत या. 6 सप्टेंबरला मी शहीद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे आणि लवकरच LOC वरही जाईन.''  आफ्रिदीच्या या ट्विटला गौतम गंभीरने सडेतोड उत्तर दिले. त्याने म्हटले की,''या फोटोत आफ्रिदी स्वतः आफ्रिदीलाच विचारत आहे की आफ्रिदीनं बेईज्जत होण्यासाठी पुढच्या वेळेस काय करायला हवं. ज्याने हेच सिद्ध होतं की, आफ्रिदी अजून अपरिपक्व आहे. त्याच्या मदतीसाठी मी लहान मुलांचा ट्युटोरियल ऑनलाईन ऑर्डर केला आहे.''   गंभीरच्या या उत्तरानं खवळलेल्या आफ्रिदीनं भारतीय फलंदाजासाठी आणखी एक ट्विट केले. 

मर्कटलीला करणारा जावेद मियाँदाद आता काश्मीरच्या LOC वर करणार परेडपाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद हा ठळकपणे दोन गोष्टींसाठी कायमचा लक्षात राहतो. एक म्हणजे, त्याने मारलेला चेतन शर्माला अखेरच्या चेंडूवर षटकार. दुसरी गोष्ट म्हणजे, 1992 च्या विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने माकडासारख्या उड्या मारल्या होत्या. सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या वातावरणामध्ये जावेद काही खेळाडूंसह काश्मीरच्या LOC वर परेड करणार आहे. जावेदने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला. त्यानंतर पाकिस्तानने बऱ्याच पोकळ धमक्याही दिल्या. पण भारताने त्यांना काही भीक घातली नाही. त्यामुळे आता आम्ही किती शांतप्रिय आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न जावेद करणार आहे.

टॅग्स :जम्मू-काश्मीरगौतम गंभीरशाहिद अफ्रिदीकलम 370कलम 35-ए