Join us

गौतम गंभीरने वचन पाळले; शहीद जवानांच्या मुलांचा उचलणार खर्च

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला आर्मीमध्ये जाता आले नाही, याचा आता पश्चाताप होत आहे. पण आर्मीमध्ये जाता आले नसले तरी शहीद जवानांच्या मुलांसाठी गंभीर आपल्या एनजीओच्या माध्यमातून कार्य करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 16:02 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला आर्मीमध्ये जाता आले नाही, याचा आता पश्चाताप होत आहे. पण आर्मीमध्ये जाता आले नसले तरी शहीद जवानांच्या मुलांसाठी गंभीर आपल्या एनजीओच्या माध्यमातून कार्य करत आहे. गंभीरने जवानांच्या 50 मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली होती. आता यापुढे शंभर जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलणार असल्याचे  गंभीरने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

देशासाठी सेवा बजावताना शहिद झालेल्या जवानांच्या मुलांना मदत करणं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे. जीजी फाउंडेशन तर्फे आम्ही 100 शहीद मुलांच्या मुलांची काळजी घेत आहोत. त्यांच्या पूर्वजांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले आणि आता आपण किती कृतज्ञ आहोत हे दाखवण्याची आमची वेळ असल्याचे गौतम गंभीरने सांगितले आहे.

 

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय जवान