Join us

गौतम गंभीरसाठी त्याने घेतली १२ फुटांच्या सुरक्षा भिंतीवरून उडी

भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीर गेली कित्येक वर्ष राष्ट्रीय संघाचा सदस्य नसला तरी त्याचे आजही बरेच फॉलोअर्स आहेत. विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करताना तोच केंद्रस्थानी होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 13:56 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीर गेली कित्येक वर्ष राष्ट्रीय संघाचा सदस्य नसला तरी त्याचे आजही बरेच फॉलोअर्स आहेत. विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करताना तोच केंद्रस्थानी होता. सौराष्ट्र संघाविरुद्धच्या सामन्यात गंभीरने अर्धशतकी खेळी करताना संघाला ५ विकेट राखून विजय मिळवून दिला. या खेळीनंतर त्याच्या चाहत्यांने त्याच्यासाठी चक्क १२ फुटांच्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारली. 

सौराष्ट्रने पहिल्या षटकात रॉबीन उथप्पाची विकेट गमावल्यानंतरही जोरदार कमबॅक केले. चेतेश्वर पुजारा आणि शेल्डन जॅक्सन यांनी शतकी भागीदारी करताना संघाला २३७ धावांचा पल्ला गाठून दिला. 

दिल्लीलाही पहिल्याच षटकात धक्का बसला. उन्मुक्त चंद भोपळ्यावर बाद झाला. त्यानंतर ध्रूव श्रेय आणि कर्णधार गंभीर यांनी ६३ धावांची भागीदारी केली. गंभीरने ४८ चेंडूंत ६२ धावा केल्या. हिम्मत सिंगने ७४ धावा चोपल्या. पण हा सामना सुरू असताना चाहत्याने मैदानावर धाव घेत गंभीरचे पाया पडला. नेमके काय घडले पाहा हा व्हिडिओ...  

टॅग्स :गौतम गंभीरबीसीसीआय