IPL म्हणजे बॉलिवूड नाही; गौतम गंभीरचा KKR च्या खेळाडूंना 'गंभीर' इशारा!

२२ मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 05:41 PM2024-03-05T17:41:38+5:302024-03-05T17:41:59+5:30

whatsapp join usJoin us
Gautam Gambhir has guided the Kolkata Knight Riders players ahead of the start of IPL 2024  | IPL म्हणजे बॉलिवूड नाही; गौतम गंभीरचा KKR च्या खेळाडूंना 'गंभीर' इशारा!

IPL म्हणजे बॉलिवूड नाही; गौतम गंभीरचा KKR च्या खेळाडूंना 'गंभीर' इशारा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Time Table: २२ मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगणार आहे. सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. आयपीएलला सुरूवात होण्याआधी कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरने आपल्या संघातील खेळाडूंना कडक शब्दांत संदेश दिला आहे. 'स्टार स्पोर्ट्स'वरील संभाषणात गंभीरने स्पष्ट केले की, आयपीएल म्हणजे बॉलिवूड किंवा एखादी पार्टी नाही तर एक उत्कृष्ट कार्यक्रम आहे. युवा खेळाडूंना जगातील सर्वात लोकप्रिय लीगमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.

गंभीरने सांगितले की, मी पहिल्या दिवसापासूनच हे स्पष्ट केले होते की, आयपीएल माझ्यासाठी गंभीर विषय आहे. ही स्पर्धा बॉलिवूडसारखी अजिबात नाही, ही पार्टी देखील नाही. ही स्पर्धा म्हणजे बाहेर जाऊन स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची संधी देणारे एक व्यासपीठ आहे. मला वाटते की ही जगातील सर्वात कठीण लीग आहे कारण इथे स्पर्धात्मक क्रिकेट पाहायला मिळते. इतर लीगपेक्षा ही लीग कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात जवळ आहे आणि जर तुम्हाला यशस्वी फ्रँचायझी म्हणून ओळख मिळवायची असेल, तर तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर चांगली कामगिरी करता आली पाहिजे. 

दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ची तारीख जाहीर झाली आहे. यंदा आयपीएलनंतर लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे, शिवाय लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल नेमकी कुठे खेळवायची हाही प्रश्न होता. पण, याचे उत्तर मिळाले आहे. आयपीएल २०२४ ला २२ मार्चपासून सुरू होणार आहे आणि पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांनंतर पुढील वेळापत्रक जाहीर केले जाईल. 

IPL 2024 चे वेळापत्रक

  • २२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  • २३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
  • २३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
  • २४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
  • २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  • २५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  • २६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  • २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  • २८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
  • २९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  • ३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
  • ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
  • ३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  • १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
  • २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  • ३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  • ४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  • ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
  • ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
  • ७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ

Web Title: Gautam Gambhir has guided the Kolkata Knight Riders players ahead of the start of IPL 2024 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.