No Virat Kohli Or Hardik Pandya Gautam Gambhir Picks Shubman Gill Most Stylish Cricketer : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंड दौऱ्यानंतर सुट्टीचा आनंद घेत आहे. ५ सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडियाच्या ताफ्यात जॉईन होण्याआधी गंभीरनं दिल्ली प्रीमिअर लीग स्पर्धेतील फायनल सामन्याला हजेरी लावली होती. यादरम्यान त्याने ब्रॉडकास्टरला खास मुलाखत दिली. यावेळी टेलिव्हिजन अँकर आणि इन्फ्लुएंसर शेफाली बग्गा हिने टीम इंडियाच्या कोचला रॅपिड फायरमध्ये 'स्टायलिश क्रिकेटर' पासून ते अगदी 'रनमशिन' कोण? असे अनेक प्रश्न विचारले. यावर गंभीरनं केलेली 'बोलंदाजी' सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. शेफाली बग्गासह दिल्ली प्रीमियर लीगच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन गंभीरचा खास व्हिडिओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!स्टायलिश खेळाडू कोण? ना विराट ना हार्दिक; गंभीरनं घेतलं नव्या कर्णधाराचं नाव
गौतम गंभीरला ज्यावेळी स्टायलिश क्रिकेटर कोण? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्याने शुबमन गिलचं नाव घेतलं. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्याशिवाय गंभीरला गिलमध्ये स्टायलिश क्रिकेटर दिसतो, ही गोष्ट अनेकांना खटकू शकते. विराट कोहलीला 'रनमशिन' हा टॅग लावला जातो. पण गंभीरनं यावर उत्तर देताना देखील कोहलीचं नाव घेता व्हीव्हीएस लक्ष्मणचं नाव सांगितले.
किंग कोहलीला 'देसी बॉय'चा टॅग
रॅपिड फायर राउंडमधील सवाल-जवाबाच्या खेळात गौतम गंभीरनं विराट कोहलीचंही नाव घेतलं. ज्यावेळी 'देसी बॉय' कोण? असा प्रश्न आला त्यावेळी गंभीरनं दिल्लीकर विराट कोहलीचं नावं घेतलं. 'क्लच प्लेयर'च्या रुपात त्याने सचिन तेंडुलकर, 'स्पीड'संदर्भात जसप्रीत बुमराह, 'गोल्डन आर्म'साठी नीतिश राणा, 'मिस्टर कंसिस्टंट'च्या रुपात राहुल द्रविड तर रिषभ पंत हा फनी प्लेयर असल्याचे म्हटले आहे.