Arjun Tendulkar Wedding : भारत-इंग्लंड सेमीफायनलपूर्वी अर्जुनच्या लग्नात दिसले कोच गौतम गंभीर (VIDEO)

अर्जुन तेंडुलकरच्या लग्न समारंभात दिसले टीम इंडियाचे कोच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 18:14 IST2026-03-05T18:04:02+5:302026-03-05T18:14:10+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Gautam Gambhir Attends Arjun Tendulkar’s Wedding Hours Before The All Important India vs England T20 World Cup Semifinal Watch Video | Arjun Tendulkar Wedding : भारत-इंग्लंड सेमीफायनलपूर्वी अर्जुनच्या लग्नात दिसले कोच गौतम गंभीर (VIDEO)

Arjun Tendulkar Wedding : भारत-इंग्लंड सेमीफायनलपूर्वी अर्जुनच्या लग्नात दिसले कोच गौतम गंभीर (VIDEO)

Arjun Tendulkar Wedding : सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि अष्टपैलू क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर याने गुरुवारी, ५ मार्चला आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात केली. प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोक हिच्यासोबत त्याने लग्नगाठ बांधली. मुंबईतील द सेंट रेजिस हॉटेलमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडलेल्या विवाह सोहळ्यात भारतीय संघाचा माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्नीसह हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.  

अर्जुन तेंडुलकरच्या लग्न समारंभात दिसले टीम इंडियाचे कोच

मुंबईतील वानखेडेच्या मैदानात भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना खेळवण्यात येणार आहे.  या सामन्याआधी बुधवारी गौतम गंभीर सह कुटुंब बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायकाच्या मंदिरात पोहचल्याचे पाहायला मिळाले होते. संघ फायनलमध्ये पोहचावा यासाठी त्यांनी गणरायाकडे साकडे घातल्याची चर्चाही रंगली. त्यानंतर आता इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सेमीफायनल सामन्यापूर्वी त्यांची अर्जुन तेंडुलकरच्या लग्नातील खास झलक चर्चेचा विषय ठरत आहे.  टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीआधी गौतम गंभीर लग्नसमारंभात दिसणं अनेकांना आश्चर्यचकित करुन सोडणारे आहे. फक्त प्रशिक्षकच नव्हे तर काही खेळाडूही या सोहळ्यात सहभागी झाल्याचे बोलले जाते. पण यासंदर्भात अधिकृत कोणतीही माहिती किंवा फोटो समोर आलेले नाहीत.

धोनी-साक्षी ते रैना-प्रियांका! अर्जुन-सानियाच्या लग्नात क्रिकेटर्सची 'कपल स्टाईल स्टेटमेंट'ची खास झलक

जुन्या सवंगड्यांसोबतचा खास क्षणही ठरतोय चर्चेचा विषय

गौतम गंभीर यांचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात ते पत्नी नताशा जैनसह तेंडुलकर कुटुंबियातील शाही लग्न सोहळ्यात पोहचल्याचे पाहायला मिळते. युवराज सिंग आणि अशिष नेहरा या आपल्या जुन्या सहकाऱ्यांसोबत ते गप्पा गोष्टी करतानाचेही व्हिडिओमध्ये दिसून येते. सोशल मीडियावर टीम इंडियाच्या प्रशिक्षकांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

BCCI निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकरांचीही लग्नात खास झलक दिसली

अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नासाठी क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. माजी क्रिकेटर आणि  बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरही पत्नी फतिमा घडियाली यांच्यासह लग्न समारंभात सामील झाल्याचे पाहायला मिळाले होते.   

 

Web Title : अर्जुन तेंदुलकर की शादी: भारत-इंग्लैंड सेमीफाइनल से पहले गौतम गंभीर शामिल

Web Summary : अर्जुन तेंदुलकर ने सानिया चांडोक से मुंबई में शादी की। भारत के टी20 विश्व कप सेमीफाइनल से पहले गौतम गंभीर अपनी पत्नी के साथ शामिल हुए। अजित अगरकर भी मौजूद थे।

Web Title : Arjun Tendulkar Wedding: Coach Gautam Gambhir Attends Before India-England Semifinal

Web Summary : Arjun Tendulkar married Sania Chandok in Mumbai. Gautam Gambhir attended with his wife before India's T20 World Cup semifinal against England. Ajit Agarkar was also present.