Join us

सचिन तेंडुलकरला मध्यरात्री हॉटेलमध्ये फिरताना पाहून गांगुली घाबरला होता

सचिनला जेव्हा गांगुलीने हॉटेलच्या लॉबीमध्ये पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. हॉटेलच्या लॉबीमधून सचिन आपल्या रुमकडे गेला. रुमचा दरवाजा उघडला आणि झोपला. नेमका हा काय प्रकार आहे, हे गांगुलीला समजले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 14:44 IST

Open in App
ठळक मुद्देएवढ्या रात्री सचिन काय करत होता आणि कुणाबरोबर होता, हा प्रश्न गांगुलीच्या मनात आला.

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा खेळाडू म्हणून सुपरिचित असाच, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी जणांना माहिती आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा सचिनबरोबर बरीच वर्ष क्रिकेट खेळला. त्यामुळे त्याला सचिनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती आहे. त्यामुळेच एकदा सचिनला मध्यरात्री हॉटेलमध्ये फिरताना पाहून गांगुली घाबरला होता.

भारतीय संघ एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरला होता. खेळाडूंची दिनचर्या ठरलेली असते. सकाळी लवकर उठण्यासाठी खेळाडू रात्री लवकर झोपत असतात. त्यामुळे सचिनला जेव्हा गांगुलीने हॉटेलच्या लॉबीमध्ये पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. हॉटेलच्या लॉबीमधून सचिन आपल्या रुमकडे गेला. रुमचा दरवाजा उघडला आणि झोपला. नेमका हा काय प्रकार आहे, हे गांगुलीला समजले नाही. एवढ्या रात्री सचिन काय करत होता आणि कुणाबरोबर होता, हा प्रश्न गांगुलीच्या मनात आला. पण त्यावेळी हा प्रश्न सचिनला विचारायचा कसा, असा विचार गांगुलीने केला आणि तो आपल्या रुममध्ये येऊन झोपला.

दुसऱ्या दिवशी पहाटे गांगुलीने उठल्यावर थेट सचिनची रुम गाठली. ' मध्यरात्री तू कुठे गेला होतास आणि कोणाबरोबर होतास? ' असा प्रश्न गांगुलीने सचिनला विचारला. त्यावर सचिनने जे उत्तर दिले ते पाहून गांगुलीला हसू आवरता आले नाही. सचिन म्हणाला " मी मध्यरात्री कुठे गेलो होतो, हे मलादेखील सांगता येणार नाही, कारण मला झोपेत सांगायची सवय आहे. "

टॅग्स :सचिन तेंडूलकरसौरभ गांगुली