Join us

Ganesh mahotsav: डेव्हिड वॉर्नरने दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

Ganesh mahotsav: क्रिकेट वर्तुळातील अनेक खेळाडूंनी गणेशोत्सवात सहभागी होत आपल्या चाहत्यांना समाज माध्यमांवरून या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 11:18 IST

Open in App

मुंबई :  क्रिकेट वर्तुळातील अनेक खेळाडूंनी गणेशोत्सवात सहभागी होत आपल्या चाहत्यांना समाज माध्यमांवरून या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघातील आजी-माजी खेळाडू बाप्पाच्या चरणी नतमस्तक झालेले यावेळी पाहायला मिळाले; पण विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरनेदेखील आपल्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर गणपतीसोबत स्वत:चा एक फोटो पोस्ट करत त्याने जगभरातील सर्व चाहत्यांना आनंदी ठेवण्यासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली. याव्यतिरिक्त   भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना तसेच दिनेश कार्तिक आणि शुभमन गिल यांनीही चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :गणेशोत्सवडेव्हिड वॉर्नर
Open in App