Join us

'तुम्हाला १०० कोटींमधून…’’ टीम इंडियातून सतत आत-बाहेर होणाऱ्या या खेळाडूचं मोठं विधान   

Shardul Thakur: भारतीय क्रिकेट संघातील मराठमोला अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याने संघातून सतत आत-बाहेर होण्याबाबच मोठं विधान केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 16:52 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघातील मराठमोला अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याने संघातून सतत आत-बाहेर होण्याबाबच मोठं विधान केलं आहे. शार्दुल ठाकूरने सांगितले की, काही वरिष्ठ खेळाडूंप्रमाणे आपल्याला कुठल्याही स्पर्धेत सर्व सामन्यांत देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळत नाही, याचं मला वाईट वाटत नाही. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरला भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं. मात्र दिल्लीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळाली होती.

शार्दुल ठाकूरने या सामन्यात ६ षटकांमध्ये ३१ धावा देऊन १ बळी टिपला होता. त्यानंतर भारताने अफगाणिस्तानकडून मिळालेल्या २७३ धावांच्या आव्हानाचा कर्णधार रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर ३५ षटकांमध्येच फडशा पाडला होता. या सामन्यानंतर शार्दुल ठाकूरला त्याच्या संघातून सातत्याने सुरू असलेल्या आत बाहेर होण्याबाबत विचारले असता त्याने देशाचं प्रतिनिधित्व करण्यास मिळत असल्याने ऋणी असल्याचे सांगितले.

शार्दुल ठाकूरने सांगितले की, तुम्हाला जेव्हा खेळण्याची संधी मिळेल तेव्हा तुम्ही आभार मानले पाहिजेत. त्याचं कारण म्हणजे तुम्ही कोणता सामना खेळत आहात हे महत्त्वाचं नाही. तुम्हाला १०० कोटी पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळतंय, यासाठी तुम्ही आभारी असलं पाहिजे. जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. अनेकदा परिस्थिती अनुकूल नसल्यावर बाहेर बसावं लागू शकतं. तसेच त्यासाठी माझी कुठलीही तक्रार नाही. अशा परिस्थितीत माझं काम हे खेळत असलेल्या खेळाडूंना सपोर्ट करण्याचं असेल. तसेच मी कायम संघासाठी खेळत राहीन.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघशार्दुल ठाकूरवन डे वर्ल्ड कप