Join us

Kieron Pollard : ६,६,६,६,४! मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डचा लॉर्ड्सवर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये विश्वविक्रम

Kieron Pollard :  वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड याने मंगळवारी ट्वेंटी-२० क्रिकेमध्ये विश्वविक्रम केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 13:18 IST

Open in App

Kieron Pollard :  वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड याने मंगळवारी ट्वेंटी-२० क्रिकेमध्ये विश्वविक्रम केला. पोलार्ड सध्या The Hundred लीगमध्ये लंडन स्पीरिट संघाकडून खेळतोय आणि त्याने मंगळवारी मँचेस्टर ओरिजन्स संघाविरुद्ध ११ चेंडूंत नाबाद ३४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १ चौकार व ४ षटकारांचा समावेश होता. लॉर्ड्सवर झालेल्या या सामन्यात पोलार्डने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली. 

पोलार्डने २००६मध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर त्याने अनेक ट्वेंटी-२० लीगमध्ये सहभाग घेतला. त्याने मागच्या वर्षी झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजचे नेतृत्व सांभाळले होते. परंतु त्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केली. पण, तो फ्रँचायझी लीगमध्ये खेळतोय आणि त्याने मंगळवारी ६०० वा ट्वेंटी-२० सामना खेळला. ६०० ट्वेंटी-२० सामने खेळणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला आहे. 

लंडन स्पीरिटने १०० चेंडूंत ६ बाद १६० धावा केल्या. झॅक क्रॅवलीने ४१ धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेल ( २१), कर्णधार इयॉन मॉर्गन ( ३७) आणि पोलार्ड ( ३४*)  यांनीही चांगली फटकेबाजी केली. प्रत्युत्तरात मँचेस्टर ओरिजनल्सचा संघ ९८ चेंडूंत १०८ धावांवर तंबूत परतला. फिल सॉल्टने सर्वाधिक ३६ धावा केल्या. जॉर्डन थॉम्सनने २१धावांत ४ विकेट्स घेतल्या. मेसन क्रेन व लिएम डॉसन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.  

पोलार्ड आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्याने ६०० ट्वेंटी-२० सामन्यांत ५३३ डावांमध्ये ३१च्या सरासरीने ११७२३ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ५६ अर्धशतकांचा समावेश आहे. या फॉरमॅटमध्ये पोलार्डने ७८० षटकार खेचले आहेत. त्याच्या नावावर ३०९ विकेट्सही आहेत.  ''या फॉरमॅटमध्ये ६०० सामने खेळीन असा विचार केला नव्हता. पण, हा विक्रम झाला कारण मी हा फॉरमॅट एन्जॉय करतोय, ''अशी प्रतिक्रिया पोलार्डने दिली. 

टॅग्स :किरॉन पोलार्डटी-20 क्रिकेट
Open in App